विनायक जितकर
तत्काळ दखल घेत ०५ दिवसात लोखंडी पूल तयार…
शहापूर – शहापूर तालुक्यातील पिवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हेदुचा पाड्यातील विद्यार्थ्यांचा लाकडी पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. स्थानिक माजी आमदार पांडुरंगजी बरोरा यांनी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती; यांची तत्काळ दखल घेत ०५ दिवसात लोखंडी पूल तयार केला. जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते लोखंडी पुलाचे उद्घाटन केले.
शहापूर तालुक्यातील पिवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हेदुचा पाड्यातील विद्यार्थ्यांचा लाकडी पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हेदुचा पाड्यातील २३ विद्यार्थी पिवळी येथील किल्ले माहुली विद्यालय व रताळेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात; परंतु त्यांना शाळेत जाताना नाला लागतो, हा नाला पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असल्याने जाण्या-येण्याचा रस्ताच बंद होतो. त्यामुळे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या वाटेवर पूल नसल्याने त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता याची दखल घेण्यात आली.
यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब यांनी ह्याबाबत विनंती केली होती यांची तत्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी तत्काळ जिल्हा नियोजनच्या माध्यमातून विक्रमी ०५ दिवसा मध्ये लोखंडी पूल तयार केला आहे. |
विद्यार्थी व स्थानिक रहिवाशी यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले आहेत. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील साहेब, माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.