कौलव उपसरपंचांच्या पतीवर ग्रामपंचायतीत चाकूहल्ला
ग्रामसेवक आणी उपसरपंचाना अरेरावी आणि धक्काबुक्की; जखमीची पोलिसात तक्रार
गारगोटी : कौलव(ता.राधानगरी ) येथील ग्रामसेवक आणि उपसरपंच सरिता शहाजी पाटील, यांना ग्रामपंचायत मध्ये येऊन अरेरावी करून तानाजी आनंदा पाटील आणी हर्षद तानाजी पाटील या दोघांनी धक्काबुक्की केली.
यावेळी उपसरपंच यांचे पती शहाजी पाटील हे सोडवायला गेले असता त्यांच्यावर चाकूने वार करून जखमी केली असल्याची तक्रार राधानगरी पोलिसात दाखल झाली आहे.
ग्रामपंचायत मध्ये कामकाज सुरु असताना गावातील तानाजी आनंदा पाटील आणी त्यांचा मुलगा हर्षद दोघांनी ग्रामपंचायत मध्ये विनापरवाना येऊन ग्रामसेवक, उपसरपंच सरिता शहाजी पाटील यांना अरेरावी केली तर धक्काबुक्की केली. यावेळी उपसरपंच यांचे पती शहाजी पाटील हे सोडवायला गेले असता त्यांच्यावर चाकूने वार करून जखमी केली असल्याची तक्रार शहाजी पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे.
याबाबत राधानगरी तालुक्यातील सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांची भेट घेतली. ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू असताना असे जर हल्ले होत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वांनी केली आहे. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्ष धीरज डोंगळे, सरपंच प्रभाकर पाटील, युवराज पवार, यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते
================