WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

संपूर्ण गडकिल्ले भारताचे शिव वैभव असल्याने केंद्र व राज्य सरकारने जोपासना करावी 

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

 निमित्त 🚩🚩19 फेब्रुवारी शिवजयंती 🚩🚩 

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा एक महाराष्ट्राचा उत्सवाचा सन आहे.त्यामुळे 19 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केल्या जातो.सन 1869 साली महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम पोवाडा लिहिला.शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी फुलेंनी सन 1870 साली शिवजयंतीची सुरूवात केली.ती पहीली शिवजयंती होती.त्यानंतर शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्याचे काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले. 20 व्या शतकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली व दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटात शिवजयंतीला सुरूवात झाली.महाराष्ट्र सरकारने 2001 पासून शके 1551 (शुक्रवार 19फेब्रुवारी 1630) ही शिवजयंतीची तारीख स्वीकारली त्यानुसार महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी सार्वजनिक सुट्टी जाहिर केली.

इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही जन्म तारीख मानली जाते.त्यानुसार महाराष्ट्राबाहेर अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस मानतात.त्याचप्रमाणे वेगवेगळ्या दिनदर्शिकामध्ये शिवजयंतीची वेगवेगळी तारीख दाखवीली आहे. महाराष्ट्रात शिवजयंतीच्या तारखेला महत्व नसुन त्यांचे कर्तुत्व,त्यांचा त्याग,रयतेची जबाबदारी आणि लाखोंनी सैन्य घेऊन चढाई करणाऱ्या मोगल साम्राज्याचा अंत करणे हे महत्वाचे आहे.मी तर म्हणेल की शिवजयंती रोज साजरी व्हावी आणि शिवाजी महाराजांचे गोडवे जनतेपर्यंत पोहचवावे.तेव्हाच भारतात एकच नाही तर  लाख शिवा तयार होतील.कारण शिवाजी महाराजांच्या पुण्यांयीनेच आज आपण ताठ मानाने आणि स्वाभिमानाने जगत आहो.गनीमीकाव्याने मोगलायीचा व मोगल साम्राज्याचा अंत केला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.याचा गर्व महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला आहे.आज भारताची गौरव गाथा जी आपण ऐकतो त्याचे संपूर्ण श्रेय शिवरायांनाच आहे.शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताची अबाध्य शक्ती आहे.शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचले पाहिजे.जानता राजा, रयतेचा राजा,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून जगभर ख्याती प्राप्त आहे.

केवळ महाराष्ट्रातच किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते.तत्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात.19 फेब्रुवारी रोजी सुमारे 111 पेक्षा अधिक देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.असे सांगण्यात येते की शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे सुध्दा होते.कोणत्या घोड्यांचा वापर केव्हा करायचा हे त्यांना चांगलेच अवगत होते.शिवाजी महाराजांकडे मोती, विश्र्वास,तुरंगी, इंद्रायणी,गाजर,रणभीर,कृष्णा असे 7 घोडे होते.शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना सुमारे 400 गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते.काही गड त्यांनी स्वत: बांधले तर काही किल्ले लढाया करून जिंकले.महाराजांचा एक गडकिल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच होते. त्यामुळे मी केंद्र व राज्य सरकारला आग्र करतो की महाराष्ट्रातील संपूर्ण गडकिल्ल्यांची देखरेख करून सुसज्जीत केले पाहिजे.यातच शिवरायांना खरा मानाचा मुजरा ठरेल.कारण महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील गडकिल्ले ही भारताची धरोहर  व शान आहे.कारण गडकिल्ल्यामुळेच  शिवरायांच्या आठवणी पुन्हापुन्हा जागृत होतील.

गडकिल्यांची सुरक्षा म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांना खरे अभिवादन व मानवंदना ठरेल.कारण शिवरायांनी मुठभर मावळ्यांच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व संपूर्ण किल्ले काबीज केले हा अभिमान महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला आहे.त्यामुळे इतिहास जागृत ठेवण्यासाठी संपूर्ण किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने व शिवरायांची आठवण या उद्देशाने किल्ल्यांचे जतन करणे गरजेचे आहे.कारण शिवाजी महाराज रयतेचे राजा होतेच.त्याचप्रमाणे त्यांच्यात दैवी शक्ती सुध्दा होती.393 वर्षांनंतर आजही कुठल्याही गडकिल्ल्यांवर गेले तर 4 हजार फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्ल्यावर स्वच्छ पाणी प्यायला मिळते.हा संपूर्ण शिवरायांचाच प्रताप आहे.असे सांगण्यात येते की वयाच्या 17 व्या वर्षी शिवरायांनी स्वत: डिझाईन करून रायगड किल्ला बांधल्याचे सांगण्यात येते.आई जगदंबेच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण काम फत्ते केले व मावळ्यांमध्ये उर्जा निर्माण करून मोगलांना भुईसपाट केले.अबझल खानासारख्या महाकाय शक्तीशाली सरदाराला गनीमीकाव्याने यमलोक पोहचवीले. अशाप्रकारे मोगलांच्या संपूर्ण सरदारांना एक-एक करून धाराशाही करण्याचे काम शिवरायांनी व त्यांच्या सरदारांनी आणि मावळ्यांनी केले.हा देश साधुसंतांचा,थोरमहात्म्यांचा, क्रांतीकारकांचा व हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवरायांचा देश आहे.याची जोपासना महाराष्ट्र व केंद्र सरकारने करावी.

रमेश कृष्णराव लांजेवार.                                     (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.9921690779, नागपूर.

देशात वाढते अत्याचार रोखण्यासाठी, महागाई,शेतकरी व कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शिवरायांच्या तत्त्वांच्या अनुकरणाचा वापर करून केंद्र व राज्य सरकारने रयतेच्या सुरक्षेची व सुख-समृध्दीची जबाबदारी स्वीकारावी.यातच खरे शिवजयंतीचे महत्त्व दिसून येईल.त्याचप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने  मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करायला हवे.यामुळे संपूर्ण गडकिल्ले सुशोभित होईल व जिकडे-तिकडे आपल्याला हिरवा गालीचा दिसून येईल.त्याचप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीने जर वृक्ष लागवड केली तर प्रत्येक झाडाच्या पानात, फुलात, फळात आपल्याला शिवाजी महाराजांचे दर्शन अवश्य होईल व त्यांच्या आठवणी अनंत काळापर्यंत टीकुण राहील.त्यामुळे शिवजयंतीचे औचित्य साधून सरकार, राजकीय पक्ष,सामाजिक संघटना,शिव भक्त व देशातील नागरिक यांनी प्रत्येकांनी एक तरी  झाड लावले पाहिजे.यामुळे वाढत्या प्रदूषणावर मात करण्यास मोठी मदत होईलच.त्याच प्रमाणे गुरांना चारा व संपूर्ण जीवसृष्टीला ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल.त्यामुळे एकाच दिवशी लाखो झाडे लावल्या जातील ही झाडे अनेक युगांपर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहिल.छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा.

देशातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राजकीय पुढाऱ्यांनी गांधींजींच्या विचारांचे अनुकरण करावे

 

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी