पुणेः मंडईतील रामेश्वर चौक परिसरात वैमनस्यातून दुचाकीस्वार तरुणावर गोळीबार करुन पसार झालेल्या मुख्य आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेने पकडले. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आले. नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी अक्षय वल्लाळ या तरुणाचा खून झाला होता. वल्लाळ याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मंडईतील रामेश्वर चौक परिसरात वैमनस्यातून दुचाकीस्वार तरुणावर गोळीबार करुन पसार झालेल्या मुख्य आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेने पकडले. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आले. नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी अक्षय वल्लाळ या तरुणाचा खून झाला होता. वल्लाळ याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले, अजय थोरात, अमोल पवार, अनिकेत बाबार, निलेश साबळे, तुषार माळवदकर आणि पथकाने ही कारवाई केली. तपासात आरोपींनी अक्षय वल्लाळ याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. वल्लाळ याचा किशोर शिंदे आणि साथीदारांनी नाना पेठेत खून केला होता. वल्लाळ याचा मावसभाऊ बाळकृष्ण गाजुल याने कट रचून किशोरचा भाऊ शेखर याच्यावर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले.
गजबजलेल्या मंडई भागात दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या दरम्यान दुचाकीस्वार शेखरला अडवून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली होती. पसार झालेल्या आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट एककडून शोध घेण्यात येत होता. आरोपी रुपेश आणि साथीदार प्रथमेश कोंढवा भागात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार बाळकृष्ण याला मार्केट यार्ड परिसरात सापळा लावून पकडण्यात आले. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आले.