WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कर्नाटकप्रमाणे अन्य राज्यात भाजपचा पराभव होईल; महाराष्ट्रातील निवडणूकीत महाविकास आघाडी भाजपला आव्हान देईल – महेश तपासे

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

जयंत पाटील यांच्यावरील कारवाई भाजपवरच बुमरँग होईल… राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक १७ मे रोजी…

मुंबई – कर्नाटकातील जनतेने धर्मनिरपेक्ष शक्तींना निवडले असून येत्या काही महिन्यात इतर राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये हाच कल कायम राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत आज व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत जवळपास ५० टक्के जागा गमावून मोठा पेच निर्माण करणाऱ्या भाजपला कर्नाटकने साफ नाकारले आहे.ज्या पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला असतानाही भाजपचा दारुण पराभव होतो याचा अर्थ पंतप्रधानांची प्रतिमा घसरली आहे हे स्पष्ट होते असा थेट हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला.

दरम्यान कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. आता शिंदे – फडणवीस सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही व्यापक प्रचार मोहीम राबवणार असल्याचे महेश तपासे यांनी जाहीर केले. रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात काय म्हटले आहे आणि महाविकास आघाडीला घालवण्यासाठी राज्यपालांच्या कार्यालयाचा दुरुपयोग कसा झाला हे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगणार असल्याचेही महेश तपासे यांनी सांगितले.

अचानक आलेल्या उष्णतेमुळे महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा पुढे ढकलण्यात आली होती आणि आता हवामानाच्या परिस्थितीनुसार पुन्हा सुरु करुन या सभेत कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही महेश तपासे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर भाजप करत असल्याचा आरोप महेश तपासे यांनी करतानाच जयंत पाटील हे उच्च सचोटीचे आणि नैतिक चारित्र्याचे व्यक्ती आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, त्यामुळे केंद्रीय एजन्सींद्वारे दबाव आणून त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही भाजपचा हा डाव त्यांच्यावरच बूमरँग होईल असेही महेश तपासे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही भाजपच्या हृदयावर जड दगड असून त्यांच्यात सर्व काही आलबेल आहे असे दिसत नाही. ठाण्यातील शिंदे पदाधिकारी हे भाजप नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे करू देत नसल्याची तक्रार मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. नवीन मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचे श्रेय उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना घेऊ दिले नाही आणि फडणवीस यांनीच हे नाव सुचविले होते याची आठवणही महेश तपासे यांनी करून दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बुधवार दिनांक १७ मे रोजी सकाळी ११ वाजता चव्हाण सेंटर मुंबई येथे आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहितीही महेश तपासे यांनी यावेळी दिली. समीर वानखेडे प्रकरणावर आता भाजपचे नेते गप्प का आहेत, असा सवाल महेश तपासे यांनी केला असून, वानखेडेचे गुणगान करणारे भाजपचे काही नेते आता गप्प बसले आहेत असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी