मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून फणसवणे उमरे रस्त्याचे गटाराविना काम अपुर्ण
गटाराचे पाणी सोडले मुख्य रस्त्यावर, पावसाळ्यात तर फणसवणे नाक्यात ढोपरभर पाणी…
👉🏻 ठेकेदाराची मस्ती की सत्तेचा माज, अंदाज पत्रकात रस्त्याला गटार नाहीच का ? ग्रामस्थांचा सवाल..
✍🏻 सत्यवान विचारे / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे उमरे बसवंणकर वाडी या 6 की,मी, रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे 4 कोटी 14 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते, या रस्त्याच्या कामाला ठेकेदार विलास चाळके यांनी सन 2019 ला सुरवात केली ते जून 2022 ला पुर्ण करण्यात आले.काम कागदोपत्री पुर्ण झाले असले तरी जेथून या रस्त्याला सुरवात होते त्या फणसवणे नाका येथे गटार न मारल्याने रस्त्याचे पुर्ण पाणी संगमेश्वर नायरी रस्त्यावर पावसाळ्यात ढोपरभर कळंबस्ते पुलावर वाहत होते, त्यामुळे मुख्य रस्त्याची धूप होत असुन वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तर पादचाऱ्यांच्या अंगावर गढूळ पाणी उडत होते, शाळेत वा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा सामना करावा लागत होता.
👉🏻 निव्वळ पक्षाचा पदाधिकारी असल्याने या कामाकडे वरिष्ठ अधिकारी काना डोळा करत असल्याने ग्रामस्थानी कितीही बोंब मारली तरी आपले कोणी काहीही करु शकत नसल्याचा समज या ठेकेदारचा होत असुन ही ठेकेदाराची मस्ती की सत्तेचा माज होता. याविषयी चौकशी करण्याची मांगणी ग्रामस्थ करत आहेत.या भागातील एक शिष्टमंडळ लवकच जिल्ह्याचे पालक मंत्री महोदयांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते राजु तांबे, सुधीर पावस्कर, प्रभाकर विचारे यांनी दिली आहे.
▪️लोकांची होत असलेली ओरड पाहून येथील ग्रामस्थानी अणेक वेळा ठेकेदार विलास चाळके यांना समंधित गटार काढून मुख्य गटाराला जोडण्याची विनंती केली, तसेच आपण प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी असेही संगितले, तर या रस्त्यावर देखभाल करणारे अभियंता नागवेकर यांना ही विंनती केली, प्रत्येक वेळी आज करतो करीत अद्याप या रस्त्याला गटार मारलेले नाही.
▪️कळंबस्ते तेलेवाडी येथे दोन्ही बाजूनी आर सी सी चे बांधकाम करुन पक्की गटारे, संवरक्षण भिंत, पक्क्या मोऱ्या, एवढेच न्हवे तर काही ठिकाणी पायऱ्या या ठेकेदाराने बांधून दिल्या आहेत, मात्र जेथे गटाराची आवशकता आहे तेथे साधे गटार खोदलेले नाही.यामुळे या कामाच्या अंदाज पत्रकात फक्त एकाच वाडी पूर्ती गटाराची तरतूद आहे काय? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.काही ठिकाणी मोरी साठी पाईप टाकले आहेत मात्र पाणी जाण्यासाठी कोणत्याच बाजूला खोदाई केलेली नाही.
▪️फणसवणे येथे गटार मारावे यासाठी संबंधित विभागाकडे फणसवणे ग्रामपंचायत कार्यालयाने पत्रव्यवहार केला होता मात्र ठेकेदार हा राजकीय पक्षाचा जिल्हा पदाधिकारी असल्याने कोणीही लक्ष दिलेले नाही असा ग्रामस्थ्यांचा आरोप आहे.
तुमच्या गावच्या समस्या, विकास, उपक्रमसाठी POSITIVVE WATCH व्यासपिठ 24 तास उपलब्ध