प्रस्थापितांविरोधातील युवकांची एकजूट आता शिवसेनेच्या झेंड्याखाली; आगामी निवडणुकांसाठी ताकद वाढवण्याचा निर्धार
धामोड (प्रतिनिधी) – चांदे ता. राधानगरी येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित पुढाऱ्यांविरोधात उभा ठाकलेला चांदे गावातील युवकवर्ग आता नव्या राजकीय दिशेने एकवटला आहे. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी, दूध संस्था किंवा सोसायटीचा आधार नसतानाही केवळ एकजुटीच्या बळावर युवकांनी निवडणुकीत प्रस्थापितांना जोरदार आव्हान दिले होते. या लढतीत निसटता पराभव पत्करावा लागला असला, तरी युवकांच्या जिद्दीने गावात नवा राजकीय पर्याय उभा केला आहे.
याच पार्श्वभूमीवर भविष्यातील निवडणुकांसाठी संघटित ताकद उभी करण्याच्या उद्देशाने चांदे येथील शेकडो युवकांनी शिवसेना (शिंदे गट) नामदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाहीर पक्षप्रवेश केला. पुढील प्रत्येक निवडणूक आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या प्रवेशामुळे राधानगरी तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून युवकांच्या एकजुटीमुळे आगामी काळात राजकीय वातावरण अधिक चुरशीचे होण्याची चिन्हे आहेत.
या जाहीर प्रवेशात उज्वल कांबळे, चंद्रकांत खाडे, अतुल प्रभाकर पाटील, नंदकुमार खाडे, अमर साळोखे, विजय आदिगरे, नितीन सोनवले महाराज, कमलाकर पाटील (मेजर), पंकज खाडे, स्वप्नील रोगे, ओंकार खाडे, अक्षय खाडे, वैभव खाडे, शिवाजी यशवंत, आण्णापा धोंडी कांबळे, श्रीपती कांबळे, कृष्णात डकरे, राहुल खाडे, राजेंद्र खाडे, तानाजी पाटील, पवन पाटील, पवन रोगे, नामदेव कांबळे, संदीप कांबळे, सागर सुतार, रणजीत पाटील, राहुल सोनवले, पोपट कांबळे, विजय पाटील, विशाल पाटील, संभाजी भिसे, पंकज आदिगरे, ऋषी कोकाटे, गणेश कोकाटे, शुभम पाटील, गणेश डकरे, अनिल पाटील, गौरव पाटील, संतोष पाटील, विक्रम पाटील, सागर साळोखे आदींसह शेकडो युवकांचा समावेश होता. तसेच या पक्षप्रवेशासाठी नेताजी सारंग, कपिल पारकर, अशोक पाटील (आबा), सुभाष पाटील येळवडे, संग्राम रोगे, महेंद्र पाटील, राहुल आदिगरे, अरुण पाटील, अक्षय रोगे, ऋतुराज रोगे, प्रदीप रोगे आदींचे सहकार्य लाभले.























































