सायंकाळी ‘अप-ड्राफ्ट’ आणि पहाटे ‘डाऊन-ड्राफ्ट’मुळे कोसळतोय गारांसह पाऊस: आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांचे विश्लेषण
मुंबई : महाराष्ट्रात वादळीवाऱ्यासह विजांचा कडकडाट व गारा आणि गारपीटीसह पाऊस कोसळत आहे, त्याचे कारण सायंकाळी वातावरणातील ‘अप-ड्राफ्ट’ आणि पहाटे निर्माण होणारा ‘डाऊन-ड्राफ्ट’ आणि क्युमोलोनिंबस ढगांची वेगवान निर्मिती हे शास्त्रीय विश्लेषण करीत ‘अंदाज नव्हे माहिती’ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.
घाबरून जाऊ नका! आरोग्याची काळजी घ्या!
महाराष्ट्रात तापमान सुमारे ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. तर रात्रीच्या वेळी तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा खाली महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोहचत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बाष्प उपलब्धता आहे. परीणामी भौगोलिक परिस्थितीनुसार वातावरणातील अस्थिरता, हवेचा उर्ध्व झोत (अप ड्राफ्ट) तसेच पहाटे अंध: झोत (डाऊन ड्राफ्ट) यामुळे महाराष्ट्रात कुम्युलोनिंबस ढग बनत व विजांच्या कडकडाटासह विस्कळीत स्वरुपात गारपीट होत आहे. साबुदाणा ते वाटाणा आणि क्वचित काही ठिकाणी बोरांच्या आकाराच्या गारा पडत आहे.
साधारणतः पुढिल किमान तीन ते पाच दिवसांपर्यंत वातावरणातील अस्थिरतेमुळे अशीच परिस्थिती राहू शकेल. शेतकऱ्यांनी शेतातून बाहेर काढलेले पिक शक्य असल्यास ताडपत्रीने झाकून वाचवावे अथवा मजूरांच्या उपलब्धतेनुसार सुरक्षित व कोरड्या जागी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपले पिक व काढलेली अन्नधान्य स्वानुभवाने निर्णय घेत अंमलबजावणी करीत सुरक्षित करावे.
वातावरणातील तापमानात वि तसेच लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला, मधुमेह, अस्तमा, रक्त दाब असलेल्या नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पुढिल आठवड्यात देखील ढगाळ वातावरणासह विस्कळीत स्वरुपात सरासरी साधारणतः १० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता कायम आहे अशी माहिती हवामान संशोधक प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे. |
…का बनतोय अप आणि डाऊन ड्राफ्ट?
दिवसा सुर्य प्रकाश आणि वाढलेल्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे वरच्या दिशेने जाणारा हवेचा उर्ध्व झोत म्हणजे अप ड्राफ्ट निर्माण होत आहे. तर रात्री तसेच पहाटे वातावरणातील थंडाव्यामुळे जड झालेले हवेच तर वरून खालच्या दिशेने आल्याने अंध: झोत म्हणजे डाऊन ड्राफ्ट तयार होत विजांच्या कडकडाटासह गारा आणि गारपीटीसह पाऊस कोसळत आहे असे शास्त्रीय विश्लेषण प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले.
...विजांपासून व्हा सुरक्षित!
दोन ढगांची टक्कर नव्हे तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण होणारा विद्युत भार हे विजा चमकण्याचे वैज्ञानिक सत्य आहे. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ढगांतून जेव्हा विदयुतभार वाहून जातो तेव्हा वीज चमकते. विजांचा गडगडाट ऐकू आला किंवा विजा चमकत असतात दिसल्या तर शेवटचा गडगडाट ऐकू आल्या पासून किंवा शेवटची चमकणारी विज दिसल्या पासून आसरा घेतलेल्या सुरक्षित ठिकाणीच किमान तीस मिनिटे थांबून आपला बचाव करावा असे ही त्यांनी सांगितले.