विनायक जितकर
शिवसेना महिला आघाडी कोल्हापूर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच युवतीसेना कोल्हापूर यांच्या वतीने राज्य सरकार चा महागाई विरोधात जोरदार हल्लाबोल…
वाढत चाललेली महागाई, वाढते गॅस दर, आणि लोकांच्या खिशाला बसणारी, याच्या विरोधात आज कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने, महिला दिनाच्या निमित्ताने, आम्ही यां महागाई मध्ये महिला दिन कसा करायचा असा सवाल उपस्थित केला ?
या निदर्शनावेळी स्मुर्ती इराणी, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, उद्धव ठाकरे यांच्या जय जय कराच्या घोषणा महिला पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आल्या,तसेच आंदोलन स्थळी गॅस टाक्या ही आणल्या होत्या.
ही निदर्शने कोल्हापूर मधील छत्रपती शिवाजी चौक इथं घेण्यात आली, यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघाटीका स्मिता सावंत मांडरे , सविता कानूरकर, मंगल पोवार, स्वरूपा कुरदळे,सुरेखा गाडीवडर, जयश्री पाटील, नम्रता पाटील, अश्विनी देसाई, सानिका दामूगडे, अनिता ठोंबरे, वंदना शेळके,विद्या साळोखे, माधवी लोणारे, शोभा खेडकर याचं बरोबर असंख्य महिला उपस्थित होत्या.