राजकारणी,शहरी लोकांनीही आवर्जून पहावा!
सिनेमा टॅक्स फ्री व्हावा
(शीतल करदेकर) **
भारत कृषिप्रधान देश! शेतकरी आपला अन्नदाता! लाखाचा पोशिंदा! मात्र बळीराजा आत्महत्याग्रस्त होत चाललाय, श्रीमंत शेतकऱ्यांवर अनेक संकटं येतात! ग्रामीण आणि सर्व प्रकारचे राजकारण शेतकऱ्यांच्या जगण्याला बोलून खातेय! अनेकजण दिशाभूल करतात!सहकाराने शेतकऱ्यांचा विकास होणे अपेक्षित म्हणून सहकारातून समृध्दी चे लक्ष ठेवून शेतकऱ्यांनाही मालकीचा वाटा दिला गेला,पण वर्चस्ववादातून येणारा माज,दमनाची वृत्ती इथेही गप्प बसत नाही!धानाला,उसाला ,कापसाला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्याला आजही अनेक संकटातून जावं लागतं!
आज अधिवेशनात शेतकऱ्यांचे विषय मांडणारे नेते आणि घोषणा करणारे सरकार !हे पहाताना ‘रौंदळ’ चित्रपट सर्वत्र पोहोचला पाहिजे ! वास्तव आणि शेतकऱ्याची दमनशाहीची लढाई सर्वत्र पोहोचली पाहिजे हे मनात जास्त गडद झालं!हताश न होता हक्कासाठी काय करावं आणि दुसर्याचेदमन करणारे नेते,राजकारणी यांनाही मर्यादेत रहायला हवं नाहीतर शेवट वाईटच असतो हे प्रखरपणे सांगणारा हा चित्रपट आहे!सर्व प्रथम लेखक दिग्दर्शक गजानन पडोळ यांचे अभिनंदन!
या विषयात माध्यमांची भूमिका त्याचे होणारे दोन्ही त्यानी छान आठवले आहे! ही गोष्ट एका गावातली,चित्रपटाच्या नायकाला शिवाला सैन्यात भरती व्हायचय! देशाची सेवा करायचीय! पण तसं होत नाही, त्याचा आजोबा शेती करणं ही सुध्दा देशसेवा आहे असं सांगतात!
३ मार्च पासून धुव्वाँधार… ॲक्शनपॅक्ड ‘रौंदळ’ का व कशासाठी पहा !
गावात शिवाला सगळे मानतात,सैनिकी उपाधीही देतात! शेवटचं नि वडील गुलाबराव याचं तसं पटत नाही,पण आजोबांबरोबर छान जमतं, शिवाची आई प्रेमळ आहे, त्यांच्यावर प्रेम करणारी नंदा आहे!दोघाचं छान प्रेम खुलतं, त्याला वास्तव बाज आहे! गावातल आपल्यापुढे सुंदरपणे येते, शिवाच्या शेतातले उभे उसाचे पीक! त्याची तोडणी करण्यापासून कारखान्यात उस जाण्यापूर्वीच धडपड, राजकारण, अडवणूक व्यवस्थित येते!सहनशक्ती संपल्यावर शिवा काय करतो आणि कोणत्या परिणामांना कुटुंब सामोरी जाते ते रौंदळ मधे नेटकेपणाने येते,राजकारण ,मिडिया आणि कारखान्यातील शेतकऱ्यांची हतबलता! निवडणुकीतला राग आणि जीवघेणा विखार सगळच विचार करायला लावते!
चित्रपटाचा शेवट तर उत्तम कळसाध्याय! शिवाचे कुटुंब, खलनायक बिट्टू शेठ त्याचे वडील विक्रम अण्णा गावकरी,सरपंच या सगळ्यातच आपण नकळत जोडले जातो!तर हा चित्रपट खूप सुंदरपणे वास्तव माडतो! मराठीत इतक्या सहजतेने एक विषय थेट पोहोचण्याची शैली चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे कडे होती! तीच शैली या मांडणीत दिसते! सुरूवात ते शेवट चित्रपट कंटाळवाणा होत नाही! कला ,संकलन गाणी ,अभिनय सर्वच बाबतीत उजवा सिनेमा आहे!
यातील ‘मन बहरलं…’, ‘ढगानं आभाळ…’ या गाण्यासोबतच ‘भलरी…’ हे शेतावरील गाण सुंदर आहे!भाऊसाहेब शिंदे नायकाच्या भूमिकेत आपली छाप सोडतात, त्या भूमिकेत जान भरतात,चालण्याची बोलण्याची लकब सुंदर !त्यांना या कामासाठी पुरस्कार मिळतील, तेच खलनायक झालेल्या यशराज डिंबळे बद्दल सांगता येईल,झकास काम केलंय ! नायिका झालेली नेहा सोनावणे सहज नेमकेपणे भूमिका साकारते,यातले संजय लकडेनी साकारलेले आजोबाही मस्त!
आर आर आर सिनेमाला आपण डोक्यावर घेतलं पण मराठीतला हा एक नायिकी आरआर आर म्हणून सर्वानी पहायला हवा! सरकारने हा सिनेमा टॅक्सफ्री करायला हवा! शेतकरी आत्महत्या कमी होतील, एक उर्जा देईल असा हा रौंदळ आहे!