पद्मभूषण नागनाथअण्णा हे चालते बोलते विद्यापीठ – हुतात्मा संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी
शिराळा (जी.जी.पाटील) कोरोनाच्या काळात आपणांस मोठे कार्यक्रम घेता आले नाहीत. नागनाथअण्णा हे चालते बोलते विद्यापीठ होते. आपण पहिल्यांदा नागनाथअण्णा यांना समजुन घेणे गरजेचे आहे. त्यांची समाजाबाबत असणारी कणव,आत्मियता,दुरद़ष्टीचे विचार , कार्यपध्तती आपण समजुन घेणे महत्वाचे आहे. २२ मार्च पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या ११ व्या स्म़ृतीदिनाच्या अनुशंगाने आयोजित तयारीच्या मिटींगमध्ये हुतात्मा संकुलाचे मार्गदर्शक मा. वैभवकाका बोलत होते.
अण्णा समाजाच्या विविध प्रश्नावर सातत्याने आपले विचार मांडत व ते सोडवण्यासाठी सातत्याने संघर्ष करुन तडीस नेत. पण हे करीत असताना त्यापासुन कोणत्याही राजकिय फायद्याची अपेक्षा केली नाही. धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त, कामगार, उपेक्षित वर्गासाठी अण्णा हयातभर लढले. सद्यस्थितीत आण्णांची उणीव सातत्याने भासते. अशावेळी पुरोगामी विचारींची मशाल घेऊन आपण समाजासाठी लढण्यासाठी पुढे आले पाहिजे. सहकार, बॅंकीग, दुधसंघ, नविन शैक्षणिक धोरण, कामगारांचे प्रश्न अशा विविध मुद्यांवर आपले परिसंवाद होणार आहेत. |
नागनाथ अण्णा चालते बोलते विद्यापीठ
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.