जिल्ह्यात 6 नोव्हेंबर पर्यंत बंदी आदेश लागू…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दुर्गा दौड दरम्यान आक्षेपार्ह मजकुर लिहिल्याच्या कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण…

कोल्हापूर – जिल्ह्यात विविध पक्ष/संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच कसबा बावडा या ठिकाणी नवरात्र उत्सवावेळी दुर्गा दौड दरम्यान आक्षेपार्ह मजकुर लिहिल्याच्या कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली होती. सध्या जिल्ह्यात नवरात्रोत्सव सण मोठया प्रमाणात साजरा होत आहे. या दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी 23 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 6 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणे संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.