पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
सत्ताधारी आघाडीने केलेल्या विकासकामांची दखल लाेक घेतील- उमेदवारांना विश्वास
कुंभोज -विनोद शिंगे
नरंदे तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत साठी लोकनेते सिताराम आबाजी भंडारी बापू ग्रामविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. गेल्या पाच वर्षात आपण नऊ कोटीपेक्षा जास्त रुपयाची कामे नरंदे ग्रामविकासात केली असून नरंदे ग्रामस्थ केलेल्या विकास कामांच्या व गावच्या झालेल्या प्रगतीच्या इतिहास पाहून सिताराम आबाजी भंडारी बापू ग्रामीण विकास आघाडीला विजय करतील आघाडी प्रमुख व शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक माजी उपसरपंच अभिजीत भंडारी यांनी बोलताना व्यक्त केला.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
चाैकाचाैकात, गावपातळीवर सभांना वेग
नरंदे गावच्या माजी सरपंच मीनाताई कांबळे आनंदराव भंडारी, भीमराव भंडारी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला, सिताराम बापू भंडारी पॅनेलने मोठ्या प्रमाणात नरंदे गावात विकासाच्या डोंगर उभा केले असून, नरंदे गावांमध्ये अनेक विकासात्मक सेवा सुविधा उपलब्ध करून दिले आहेत गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने मोठा पुढाकार घेतला असून.
गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सत्ताधारी आघाडीने मोठे प्रयत्न करून विकास निधी खेचून आणला आहे. गटातटाचे राजकारण न करता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम लोकनेते सिताराम आबाजी भंडारी ग्रामविकास आघाडीने केली असून. सर्वसामान्य जनता आबाजी पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभे राहून संपूर्ण पॅनेलला बहुमताने विजयी करतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी बोलताना व्यक्त केला.
सरपंच पदाच्या उमेदवार रजनी दबडे यांनी सत्ताधारी आघाडीने केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपल्या पॅनेलचा विजय निश्चित असून आपण विकास कामाबद्दल बोलणार नाही तर ती करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आघाडी प्रमुख शरद कारखाने संचालक अभिजीत भंडारी यांनी कैलासवासी सिताराम बापू भंडारी व बबन भंडारी यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या आचार विचार प्रमाणे आपण नरंदे गावात विकासात्मक धार्मिक सांस्कृतिक पद्धतीने प्रगती करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. व इथून पुढेही करणार आहोत माय माऊलीच्या सर्वांगीण विकासासाठी तिच्या संरक्षणासाठी सिताराम आबाजी भंडारी ग्रामविकास आघाडी सतत नरंदे गावच्या पाठीशी उभी असेल. असा विश्वास व्यक्त करून भंडारी ग्रामविकास आघाडीला बहुमताने विजयी करण्याचे आव्हान केले. यावेळी शांतिनाथ देसाई, रवींद्र अनुसे अभिजीत भंडारी, भीमराव भंडारी,आनंदराव भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक व पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.
सकारात्मक बातमी व तुमच्या जाहीरांतीसाठी पाँझिटीव्ह वाँच नेहमीच आपल्यासाेबत..
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.