WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

अनेकांच्या आयुष्यात येणारा हा प्रसंग.. तुम्ही कसा हाताळता! विचार नि निर्णय तुमचाच! मार्ग निघताे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

‘‘आजोबांना लग्न करायचंय “

प्रत्येक सिनियर सिटीजन, एकटे असणाऱ्यांना हा लेख नक्कीच मनाला भावनारा ठरेल.!

रामचंद्रकाका निवृत्त होऊन दोन वर्ष उलटली होती. सरकारी अधिकारी पदाची नोकरी म्हणून तीस हजार रूपये पेन्शन चालू होती. एकुलता एक मुलगा अभिजित अमेरिकेतील नामांकित कंपनीत अधिकारी म्हणून नोकरी करता-करता त्याच कंपनीतील अभियंता मुलीशी विवाहबद्ध होऊन अमेरिकेत स्थायिक झाला होता. रामचंद्रकाका व त्यांची पत्नी मालती आपल्या अलिशान बंगल्यात मोठया खुशीत दिवस काढत होेते. एके दिवशी दुर्देवाने काळाने मालतीवर झडप घातली. हृदयविकाराने मालतीचा मृत्यू झाला.

रामचंद्रकाका एकटे पडले. मुलाने अमेरिकेतील कंपनीबरोबर 5 वर्षांचा करार केला होता. त्यालाही भारतात परतणे अवघड झाले. सकाळी कामवाली शांताबाई येऊन साफसफाई व स्वयंपाक करून जायची. पण दिवसभर काय करायचे? 6 खोल्यांचा टुमदार बंगला काकांना खायला उठायचा. मालतीच्या आठवणीने काकांना व्याकुळता यायची. रात्री बंगल्यात एकटयाला भिती वाटायची. भविष्याची चिंता मनाला अस्वस्थ करायची. मनोमन काका नैराश्याकडे जायचे. आपल्याला एकटे जगणे अशक्य आहे. कोणीतरी आपली काळजी घेणारी प्रेमळ सहचारिणी असावी असे त्यांना मनोमन वाटू लागले. शरीराला वय असते, मनाला वय नसते.

काकांचे चिरतरूण मन पुन्हा एकदा आपल्याच वयाच्या महिलेशी विवाहबद्ध होऊ पहात होते. मुलाचे व त्यांचे संबंध मित्राप्रमाणे असल्याने त्यांनी मुलाला या गोष्टीबाबत फोनवर विचारणा केली असता, मुलाने त्यांना वय-खानदान-इज्जत-समाज यासारख्या अनेक गोष्टींना अनुसरून अपमानित केले. काकांच्या मनात स्वतःविषयी अपराधीपणाची भावना निर्माण झाली. आपले सर्वस्व असलेल्या एकुलत्या एका मुलाच्याही नजरेत आपण पडलो या भावनेने त्यांना नैराश्य आले. झोप उडाली. मानसिक दुर्बलता आली. आत्महत्येचे विचार मनात डोकावू लागले. त्यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या फॅमिली डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यानुसार ते ध्यान करण्यासाठी केंद्रावर आले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना पूर्णतः बोलून मनाने हलके व मोकळे केले.

व त्यांच्या मुलाला फोनवरून त्यांना पितृॠण म्हणून मदत करण्यासाठी थोडं समाज-वय-प्रतिष्ठा या गोष्टी बाजूला ठेवून पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला. अभिजितने या विषयावर अमेरिकेत समुपदेशकाची मदत घेतली व समुपदेशनानंतर तो 60 वर्षांच्या आपल्या वडिलांच्या पुर्नविवाहाला तयार झाला. पेपरला दिलेल्या जाहिरातीवरून 58 वर्षांच्या विधवा सुमती काकूंचे व रामचंद्रकाकांचे सूर जुळाले. दोघांनीही एकमेकांना समजुन घेत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. अभिजित त्याची बायको अमेरिकेतून सुट्टी काढून पुण्यात आले. आम्ही तिघांनीही काका-काकुंना माझ्या कारमधून आळंदीला नेले व नोंदणी पद्धतीने त्यांचा पुर्नविवाह लावून दिला. आपल्या टुमदार बंगल्यात हे वृद्ध जोडपे आनंदाने जगत आहे.

मित्रांनो, असे किती काका व काकू सामाजिक बंधनाच्या-नातलगांच्या- मुलाबाळांच्या भितीने एकटे जगायचे म्हणून जगत आहेत, नैराश्याकडे जात आहेत. आत्महत्या करत आहे. एकटेपणा त्यांना सतावतोय. म्हणून पुण्यात माधव दामले (8007193397) या इंजिनिअरने ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची स्थापना करून 25 काका-काकूंना एकत्र आणून विवाहबद्ध केले आहे. सुखसमाधानाऐवजी स्वतःच्या इगोला, समाजबंधनाला व घराण्याच्या प्रतिष्ठेला आपण जास्त महत्व देतो. ‘‘माझ्या म्हाताऱ्या आई-वडिलांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे.’’ असे सांणारी कर्तव्यदक्ष मुले अन्न-वस्त्र-निवारा एवढीच आईवडिलांची गरज मर्यादित नसते हे समजून घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे.. प्रत्येक माणसाच्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमभावना ही उचंबळून येतच असते. एका गीतकाराने म्हटले आहे ना, *‘‘प्यार कभी मरता नही । मरते है इंसान ॥’’

डॉ दत्ता कोहिनकर (माईंड पॉवर ट्रेनर) लेखक : “मनाची मशागत ” बेस्ट सेलर बुक. मोबाईल 9822632630

kohinkarpatil3@gmail.com

 

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.