|
नागपूर (विशेष प्रतिनिधी) : देशाचे ज्येष्ठ अभिनेते, नटसम्राट आणि आपल्या अभिनयाने अवघ्या चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) त्यांच्या जाण्याने नाना नावाचे एक धगधगते वादळ एकाएकी शांत झाले असून संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
नाना पाटेकर यांचे कार्य ‘न भूतो न भविष्यती’ असेच होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून क्रांतीची ज्योत, शिक्षणाचा प्रवाह, सर्वसामान्यांच्या समस्या, तसेच अत्याचार व भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा धगधगताना दिसायचा. त्यांची चित्रपटसृष्टीतील काम करण्याची शैली आगळीवेगळी होती. स्वभावाने ते जितके संवेनशील आणि शांत होते, तितकेच आपल्या ज्वलंत भूमिकेबाबत आक्रमक होते. त्यांचे संवाद (डायलाॅग) आणि हावभाव प्रेक्षकांच्या मनावर कायमचे कोरले गेले आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देश त्यांच्यावर अथांग प्रेम करत असे.
देशाचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि ‘नटसम्राट’ असूनही नानांचे राहणीमान अत्यंत साधे होते. गर्व, घमंड किंवा द्वेषभावना त्यांना कधीही स्पर्श करू शकली नाही. त्यांच्या कलाकृतींमधून देशभक्तीची ज्वाला, आपुलकी आणि एकतेचे प्रतीक संपूर्ण देशभर पसरले. चित्रपटांसोबतच सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय होते. नाम फाउंडेशन आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी, दुर्गम गावे आणि गोरगरिबांना मोठी आर्थिक व भावनिक मदत केली. राजकारणापासून नेहमीच कोसो दूर राहून त्यांनी निस्पृहपणे समाजकार्य केले. त्यामुळे पक्षाचे भेद विसरून प्रत्येक राजकीय पुढारी आणि सामान्य नागरिक त्यांचा आदर करत असे.
त्यांनी मीडियाच्या माध्यमातून नेहमीच थेट आणि सडेतोड संवाद साधला. शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आणि समाजातील त्रुटींवर “बाप दाखव नाही तर श्राद्ध कर” अशा धारदार शैलीत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. फिल्मफेअरच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहाय्यक अभिनेता आणि खलनायक अशा तीनही महत्त्वाच्या श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकणारे ते एकमेव भारतीय अभिनेते होते. तसेच, मराठीतील ‘नटसम्राट’ चित्रपटातील त्यांच्या अजरामर भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर मराठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
नाना पाटेकर यांच्या अकाली जाण्याने चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक भक्कम कणा कोसळला आहे.
ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
– रमेश कृष्णराव लांजेवार (स्वतंत्र पत्रकार, नागपूर)
|
महान युगपुरुष आणि नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; अभिनय आणि समाजकार्याचे एक वादळ शांत
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.











































































