मुंबईतील यशस्वी विकास मॉडेलचा अभ्यास… कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा !

धारावी येथील सुविधा केंद्राला महापौरांची भेट

CSR फंडिंगच्या माध्यमातून कोल्हापुरात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू करण्याचा संकल्प !

कोल्हापूर WATCH TEAM: मुंबईतील धारावी झोपडपट्टी परिसरात हिंदुस्तान युनिलिव्हर, HSBC आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्राला कोल्हापूरच्या महापौर सौ. रूपाराणी संग्रामसिंह निकम यांनी भेट देऊन तेथील विविध उपक्रमांची व महिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती घेतली.

            या सुविधा केंद्राच्या माध्यमातून महिलांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.या भेटीमागील प्रमुख उद्देश म्हणजे अशा यशस्वी उपक्रमांचा अभ्यास करून CSR (Corporate Social Responsibility) अर्थात कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातही महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाचे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणणे.

 खासगी कंपन्यांच्या CSR निधीचा योग्य विनियोग करून कोल्हापूर शहरातील महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक सुविधा व विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

मुंबईतील यशस्वी विकास मॉडेलचा अभ्यास… कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा ! महिला सक्षम तर कुटुंब सक्षम, आणि कुटुंब सक्षम तर शहर सक्षम!