कोल्हापूर:TEAM WATCH आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनगरीत शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने कंबर कसली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ करण्यासाठी आज शहराच्या मुख्य आणि गजबजलेल्या भागात पोलिसांचे तगडे पथसंचलन (रूट मार्च) करण्यात आले.
आज शनिवारी संध्याकाळी साडेपाचनंतर प्रिया पाटील मॅडम (उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग) यांच्या मुख्य उपस्थितीत हा सुरक्षा मार्च काढण्यात आला होता. या मोहिमेत शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, राजारामपुरी भागातील विकास जाधव साहेब, विविध पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह आरसीपी (Riot Control Police) चे जवान आणि होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रमुख मार्गांवर रंगला पोलिसांचा मार्च: शहरातील वाहतुकीच्या आणि गर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खालील परिसरांना या संचलनात कव्हर करण्यात आले:
कोल्हापूर पोलिसांच्या या शिस्तबद्ध आणि आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना कडक इशारा मिळाला असून, नवरात्रीच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर आता अधिक सुरक्षित वातावरणात सज्ज झाले आहेत.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा. 












































































