महाराष्ट्रातील मतदार यादीच्या SIR वेळापत्रकात पुन्हा बदल
दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत; अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला
मुंबई- TEAM WATCH : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) वेळापत्रकात भारत निवडणूक आयोगाने पुन्हा बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख कायम ठेवण्यात आली असून, अंतिम मतदार यादी आता १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वी अंतिम यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार होती.
सुधारित वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दावे-हरकतींच्या नोटिसा बजावणे आणि त्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी २४ सप्टेंबर रोजी केलेल्या विनंतीनंतर आयोगाने हा बदल केला आहे.
दरम्यान, ‘अनमॅप्ड’ किंवा ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’ म्हणून चिन्हांकित मतदारांना नोटिसा बजावल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीबाबतही बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. वैध कागदपत्रे साद करणाऱ्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीपासून सूट देण्यासाठी ECINET प्रणालीमध्ये ‘Exempted from Hearing’ हा पर्याय समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. कागदपत्रे अपुरी किंवा उपलब्ध नसल्यासच प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक राहणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, असुरक्षित घटक तसेच काही मतदारांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन हा प्रस्ताव करण्यात आला आहे. आयोगाने सुधारित वेळापत्रकाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही दिले आहेत.
![]() |
![]() |
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































