इंडो काउंट–उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना उपजीविकेचा नवा मार्ग !

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

CSR उपक्रमातून महिलांच्या कौशल्याला मिळाली उद्योगाची जोड

काेल्हापूरःTEAM WATH  इंडो काउंट टेक्सटाईल्स, गोकुळ शिरगाव MIDC आणि उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसहायता समूहातील तसेच उत्पादक गटातील महिलांसाठी विविध वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत महिलांना गोधडी, लॅपटॉप कव्हर, पर्स, बॅग तसेच विविध उपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उत्पादनांसाठी आवश्यक Raw Material (कच्चा माल) इंडो काउंट कंपनीकडून उपलब्ध करून दिला जात असून, कंपनीच्या CSR उपक्रमातून या महिलांना सहकार्य केले जात आहे.प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष उत्पादनाची संधी उपलब्ध झाल्यामुळे महिलांच्या कौशल्याला उद्योग व बाजारपेठेशी जोड मिळत असून, ग्रामीण महिलांसाठी उपजीविकेचा आणि उत्पन्नवाढीचा नवा मार्ग निर्माण झाला आहे. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि उद्योजकतेची भावना वृद्धिंगत होत आहे.

​

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांची प्रकल्पास भेट

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.जास्मिन यांनी गोकुळ शिरगाव MIDC येथील इंडो काउंट युनिटला भेट देऊन या संपूर्ण उपक्रमाची माहिती घेतली. त्यांनी महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची पाहणी करून उत्पादन प्रक्रिया, प्रशिक्षण, कच्चा माल उपलब्धता तसेच महिलांना मिळणाऱ्या उपजीविकेच्या संधींबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.यावेळी डॉ. जास्मिन यांनी महिलांसोबत संवाद साधत स्वतः विणकामाचा अनुभव घेतला आणि विणकामाचा आनंदही घेतला. महिलांनी आत्मविश्वासाने व कौशल्यपूर्ण पद्धतीने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. स्वतः विणकाम करून त्यांनी सहभागी महिलांचा उत्साह वाढविला आणि त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन दिले.

ग्रामीण महिलांच्या कौशल्याला उद्योग आणि CSR माध्यमातून मिळणारे पाठबळ हे महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.या प्रसंगी करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. दयानंद पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक करवीर श्री. प्रकाश लाड, तालुका व्यवस्थापक श्री. किरण रायकर, श्री. गजानन भोसले, प्रभाग समन्वयक श्रीमती अश्विनी कुंभार, ग्रामपंचायत अधिकारी  संदीप धनवडे, इंडो काउंटचे सेंटर मॅनेजर प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.