विद्यार्थ्यांना मिळणार नवी संधी… शासनाच्या याेजनांसाठी हाेणार यांचे सहकार्य! वाचा सविस्तर, करा संपर्क

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कल्याणकारी योजनांची माहिती, विद्यार्थ्यांच्या हाती– माहिती दूत बनून करणार जनजागृती

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मोहीमेस सुरुवात

कोल्हापूर: जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयामध्ये बोलावून, मागासवर्गीय नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. हे विद्यार्थी ही माहिती समाजातील तळागाळातील गरजू पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम “माहिती दूत” म्हणून करतील. इथून पुढे दर सोमवार ते शुक्रवार दररोज एका महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयामध्ये बोलावून कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्यांना विविध कल्याणकारी योजनांबाबत प्रबोधित केल्याबद्दल महावीर महाविद्यालयाचे प्राध्यापक शरद गायकवाड यांनी सामाजिक न्याय विभागाचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.आजच सुरुवात करण्यात आलेल्या उपक्रमांत महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीने राबविण्यात येणऱ्या विविध कल्याणकारी योजनांची पीपीटी मार्फत या कार्यालयाचे तालुका समन्वयक सुरेखा डवर, सचिन परब व सचिन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी प्रा. श्वेता परुळेकर, प्रा.अंकुश गोंडगे, प्रा.शैलेंद्र सडोलीकर, समान संधी केंद्र प्रमुख, महावीर महाविद्यालय कोल्हापूर ‍उपस्थित होते.

बँकांनी अधिकाधिक कर्जप्रकरणे मंजूर करावीत-नरेंद्र पाटील

 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.