बाळुमामा भंडारा यात्रा कालावधीत वाहतुक रहदारी नियमन आदेश जारी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

बाळुमामा भंडारा यात्रा उत्सव संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुक बंद करणे व वळवण्यात येणार…

कोल्हापूर – बाळुमामा भंडारा यात्रा उत्सव दि. 26 ते 28 मार्च व दि. 29 मार्च 2025 रोजी आमावस्या या कालावधीत मुदाळ तिट्टा ते निढोरी या रोडवर भाविक रोडवरुन चालत येत असतात, तसेच पुलाच्या खाली सर्वत्र भाविक असतात त्यामुळे रोडवर प्रचंड प्रमाणात गर्दी होवुन वाहतुक कोंडी होते. वाहतुक सुरु ठेवल्यास अपघात होवु शकतात. या करीता वाहतुक वळविणे गरजेचे आहे. यात्रा काळात कोणतीही बाधा येवु नये व यात्रा शांततेत साजरी व्हावी यासाठी या परिसरात पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 34 अन्वये दि. 26 मार्च रोजी सकाळी 7 वा. ते दि. 29 मार्च 2025 रोजी रात्री 12 वा. रहदारी नियमन आदेश जारी केले आहेत.

श्री बाळुमामा भंडारा यात्रा ही मोठ्या उत्साहात साजरी होते. या करीता एक ते दिड लाख भाविक स्थिर असतात तसेच येणारे जाणारे भाविक एक ते दिड लाख दरवर्षी असतात. टीव्ही सीरीयलमुळे अधिक प्रचार व प्रसार झाल्यामुळे भाविकांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. बाळुमामा मंदिर हे फोंडा ते निपाणी जाणारा राज्य महामार्गावर आदमापुर येथे रोडला लागून आहे. तसेच गारगोटी ते कोल्हापुर राज्यमार्ग हा 1 कि. मी. अंतरावर आहे. दोन्ही राज्य मार्गावरती नेहमी अवजड वाहतुक व इतर वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते.

आवश्यकतेनुसार बंद करण्यात व वळविण्यात आलेले मार्ग पुढीलप्रमाणे-

मुरगूड कुडून कोल्हापुर, मुदाळ तिट्टा, गारगोटी तसेच राधानगरीकडे जाणारी वाहतुक ही निढोरी मार्गे-सोनाळी रोड-बिद्री-मुदाळ तिट्टा मार्गे गारगोटी, राधानगरी, कोल्हापुरकडे सोयीनुसार मार्गस्थ होईल. मुदाळ तिट्टाकडून मुरगूड निपाणीकडे जाणारी वाहतुक कुर, व्हणगुत्ती, वाघापुर फाटा- निढोरी या मार्गे मुरगुड-निपाणी कडे सोयीनुसार मार्गस्थ होईल

नो पार्कंग झोन – मुधाळ तिट्टा ते निढोरी हा परिसर सर्व वाहनांकरीता नो पार्कींग झोन करण्यात येत आहे. तसेच आदमापुर येथील उड्डाण पुला खालील रोडवर सर्व वाहनांना नो पार्कींग झोन करण्यात येत आहे.

पार्किंग सुविधा – भीष्मा पार्कींग उत्तर बाजु, आदमापुर, भीष्मा पार्कींग दक्षिण बाजु, आदमापुर, आर. के. इंजिनियरींग पार्कीग, आदमापुर, पाटणे मील पार्कीग, आदमापुर, मुदाळ व गणपतराव फराकटे पार्कींग, मुदाळ या ठिकाणी भाविकांना पार्कींग करता येणार आहे.

वरील निर्देश हे दिनांक 26 ते 29 मार्च 2025 रोजी या कालावधीत दिवस-रात्र सर्व मोटर वाहनांकरीता श्री बाळुमामा भंडारा यात्रा उत्सव संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुक बंद करणे व वळवण्यात येत आहे. या शिवाय इतर रस्ते, चौक या ठिकाणी वाहतुक आवश्यकतेनुसार सुरु बंद करणे अगर वळविण्यात येत आहे. हे निर्देश सर्व शासकीय, आपत्कालीन वाहने यांना लागू असणार नाही.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.