ON DUTY-7 ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात, का? कारण वाचा!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

 

वर्कशॉमधून वेळाने बाहेर ॲटो टिप्पर काढणा-या 7 ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात

भागामध्ये स्वच्छतेच्या कामामध्ये हलगर्जी करणाऱ्या 1 आरोग्य निरिक्षक, 3 मुकादमांना कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर  : शास्त्रीनगर येथील वर्कशॉमध्ये नियमित वेळेपक्षा जास्त वेळ ॲटो टिप्पर वर्कशॉपमध्येच उभी असल्याने या ॲटो टप्परचे 7 ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश प्रशासकांनी काढले आज दिले. तसेच शहरात प्रशासकांनी फिरती करताना कामामध्ये हलगर्जीपणा केल्याने आरोग्य निरिक्षक मनोज लोट, मुकादम भगवान सातपुते, धनाजी खिलारे, कुलदिप कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

            प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी शास्त्रीनगर येथील वर्कशॉपला अचानक भेट दिली. यावेळी त्यांना वर्कशॉपमध्ये 7 ॲटो टिप्पर सकाळी 6.30 नंतरही वर्कशॉपमध्येच उभे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या गाडीवरील ड्रायवरांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी मेनरोड, बाजारपेठ, माळकर तिकटी, मटण मार्केट, भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, राजर्षी शाहू समाधी स्थळ व पंचगंगा घाट या परिसरात फिरती करुन स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी या ठिकाणी कच-याचे ढिग आढळून आल्याने व कामात हलगर्जीपणा केल्याने 1 आरोग्य निरिक्षक व 3 मुकादमांना सायंकाळी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.