पंचगंगा नदीमध्ये पोहण्यास गेलेल्या एका सात वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना
एका मुलास वाचवण्यात यश माहेर इम्रान पठाण असं मृत बालकाचे नाव कसबा बावडा परिसरात हळहळ
कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या राजाराम बंधारा इथं पंचगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झालाय. कसबा बावडा परिसरातील पीर गल्लीत राहणारा ७ वर्षीय माहीर इमरान पठाण असं मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. तर त्याचा मित्र ११ वर्षीय मानव गणेश कांबळे याला स्थानिकांनी बुडताना वाचवलं. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास माहेर आणि त्याचे मित्र राजाराम बंधारा इथं पंचगंगा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले माहीर आणि मानव या दोघांनी नदीपात्रात उडी घेतली मात्र पोहता येत नसल्याने त्या दोघांनी आरडाओरड सुरू केली. या ठिकाणी मासे पकडणाऱ्या एका तरुणाने तात्काळ नदीपात्रात उडी घेत मानव कांबळे याला पाण्याबाहेर काढले मात्र माहीर पठाण हा पाण्यात बुडाला दरम्यान दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दलाच्या रेस्क्यू फोर्सने माहेर याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला त्याला बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं माहेरी याच्या पश्चात आई आणि भाऊ आहे. सीपीआर रुग्णालयात माहेर पठाण याच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. अवघ्या सात वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याने कसबा बावडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.