तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार स्मृर्तीचा घोडावत विद्यापीठात प्रवेश
स्मृती मानधनाचा घोडावत विद्यापीठात बी.कॉम ला प्रवेश
कुंभोज- (विनोद शिंगे )
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने संजय घोडावत विद्यापीठात बी.कॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे.याबाबतची माहिती घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली. स्मृती मानधनाने बी.कॉम प्रवेशासाठी संजय घोडावत विद्यापीठाची निवड केली हा आमच्यासाठी गौरव आहे. तिच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी साठी आम्ही सर्वतोपरी मदत करू असेही विनायक भोसले म्हणाले.
संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी स्मृती मानधना हिचे येथील प्रवेशासाठी स्वागत केले. विद्यापीठाच्या शिरपेचात हिरा गवसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की विद्यापीठ नेहमीच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठबळ देत असते. यापूर्वी 18 वर्षाखालील गटात लॉन टेनिस प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या ऐश्वर्या जाधव हिला आम्ही प्रवेश देऊन सर्वतोपरी मदत करत आहोत. येथील क्रीडापटू ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.विद्यापीठाची घोडदौड सर्वोत्कृष्टतेकडे होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. योगेश्वरी गिरी यांनी देखील स्मृति मानधनाचे स्वागत केले.
स्मृती मानधना संजय घोडावत विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रीडा व शैक्षणिक दृष्ट्या उत्कृष्ट सोयी सोयी नियुक्त विद्यापीठ आहे.या परिसरात आल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा मिळते.येथे क्रीडापटूंसाठी उत्तम क्रीडा साधने व क्रीडांगण उपलब्ध असल्या कारणाने या विद्यापीठात प्रवेश घेण्याचे निश्चित केले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.