गांधी सेवाधाम विद्यालयात सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा
शिराळा (जी.जी.पाटील)
येथील हाय्यर एज्यूकेशन सोसायटी , शिराळा संचलित आरळा येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
गांधी सेवाधाम विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त मंत्रासह सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके करुन सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी योगासन व सूर्यनमस्काराचे पुरक व्यायाम प्रकार व ओंकार साधना घेण्यात आली. तसेच योगासन व सूर्यनमस्कार घेण्यात आले. यावेळी विद्यालयातील क्रीडाशिक्षक सुधीर बंडगर यांनी सूर्यनमस्कारचे महत्व व फायदे या विषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले नियमित सूर्यनमस्कार केल्याने लवचिकता टिकून राहते तसेच वजन नियंत्रित राहून आरोग्य निरोगी व तंदूरुस्त राहते. सांध्याचा व्यायाम चांगला होऊन सूर्य नमस्कारामुळे हाडाचे आरोग्यही चांगले राहते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. एस. घोरपडे , पर्यवेक्षक श्री.आर. डी. देसाई , ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस. यू. कदम , सौ.पौर्णिमा चौगुले , श्री. रितेश आमले उपस्थित होते. क्रीडाशिक्षक श्री. सुधीर बंडगर यांनी नियोजन केले.