उखळु येथे आरोग्य शिबीर पार पडले
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व ठाकरे फौंडेशन व
नेचर कॉंजर्वेशन् संस्था सांगली सहभागी
शिराळा (जी.जी.पाटील)
उखळू ता.शाहुवाडी येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि ठाकरे फौंडेशन , नेचर कॉंजर्वेशन् संस्था सांगली यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर घेण्यात आले. तसेच वनात काम करणा-या ४४ वनमजुराना जंगल शूज आणि प्रथमोपचार् किटचे वाटप करण्यात आले .पुरुष ११६ व महिला १२२ अशा २३८ जणांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
ठाकरे फौंडेशन आणि नेचर कॉंजर्वेशन् सोसायटी यांचे व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम, मुंबई सह्याद्री यांचे संयुक्त विद्यमाने
व्याघ्र प्रकल्प मधील बफर गाव उखळू मध्ये वैद्यकीय सेवा शिबीर
दि. २८ रोजी घेण्यात आले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन व वनसंरक्षक श्री नानासाहेब लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली मा.विभागीय वन अधिकारी चांदोली याचे शुभ हस्ते सुरूवात झाली.
यावेळेस ठाकरे फॉउंडेशन चे स्वप्नील पवार, खांडेकर व सहकारी तसेच नेचर कॉंजर्वेशन् संस्था सांगली चे अमोल जाधव तसेच
विभागीय वन अधिकरी गणेश पाटोळे
वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे,वनपाल हारून गारदी,वनपाल शिवाजी पाटील,
वनरक्षक उस्मान मुल्ला,सरपंच भाग्यश्री उमेश तोटफळ ईश्वर पाटील,राजाराम मुटल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ.पी.के.देशमुख,डॉ.काशीद खेडकर,
डॉ.श्वेता सहारे ,डॉ. अरबाज चौधरी ,
डॉ.सैफ शेख,डॉ.विशवनाथ चौगले या वैद्यकीय पथकामार्फत वैद्यकीय शिबीर यशस्वी पणे पार पडले.