सोनवडे येथे पारायण सोहळा उत्साहात साजरा.
शिराळा ( जी.जी.पाटील)
सोनवडे(ता.शिराळा) येथे रथसप्तमी निमित्त आयोजीत करण्यात आलेला श्री.संत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरीनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.दिंडी सोहळा व महाप्रसादाने सांगता झाली.
सोनवडे येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिरामध्ये रथसप्तमी निमित्त आयोजीत केलेल्या श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यामध्ये गाथावाचन, हरिपाठ,भजन,किर्तन यासारखे दैनदिन कार्यक्रम पार पडले.
सोहळ्याच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने ग्रंथावरती पुष्पवृष्टी करुन उपसरपंच सर्जेराव पाटील व छाया पाटील यांचे हस्ते ग्रंथपुजनाची सांगता करण्यात आली. तसेच यावेळी सोनवडे गावातुन दिंडी सोहळा काढण्यात आला यामध्ये पारंपारिक वेश परीधान करुन गावातील महिला पुरुष,युवक,बालगोपाळ सहभागी झाले होते.
- मणदूर येथील गोपालकृष्ण ज्ञानमंदिर चे बाल वारकरी सात दिवस सोनवडेतील पारायण सोहळ्यात सहभागी झाले होते.त्यांच्यामुळेच पारायण सोहळ्यास व दिंडी सोहळ्यात अधिकच रंगत आली होती.
दरम्यान या अखंड हरीनाम सप्ताह कालावधीत पार्थ महाराज (रामीष्टेवाडी),जितेंद्र महाराज (ओंड), अभिषेक महाराज(उंडाळे),विठ्ठल महाराज(मिरज),सागरनाथ महाराज(बेळगाव),जगन्नाथ महाराज(काळामवाडी),शंकर महाराज(आंबवडे),वाल्मीक महाराज(सोनवडे) यांनी आपल्या किर्तनातुन ज्ञानदान केले यावेळी प्रमोद महाराज,अजीत महाराज यांनी मृदंगवादनाने किर्तनात रंगत भरली.
सोनवडे येथील पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी दादु कुंभार,भगवान पाटील, बाजीराव जाधव, गोरख डवरी,बाबासो कुंभार,विक्रम पाटील,प्रकाश कुंभार,नथुराम कुंभार यांचेसह सोनवडे येथील पारायण मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
फोटो-सोनवडे गावातुन काढण्यात आलेला दिंडी सोहळा.