— कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी
तरुण,तरुणी तसेच चित्रपट कलाकार,तंत्रज्ञ यांची फसवणूक करणाऱ्या ताहीर कुरणे याच्यावर गुन्हा दाखल करा
लाखाे रुपयांची फसवणूक, पैसा वसूल करणार काेण ?
काेल्हापूर- कोल्हापूर येथे राहणारा ताहीर कुरणे हा गेली अनेक वर्षे तरुणांना चित्रपटात मध्ये काम देतो,मोठ्या एन्व्हेंट मध्ये पैसे मिळवून देतो. असे सांगून अनेक लोकांना फसवणूक करत आला आहे, आता पर्यंत ताहीर कुरणे याने कोल्हापूर मधील साधारण 10 ते 12 मुलींना,एक कंपनीच्या इव्हेंट मध्ये काम देऊन रोज 1000 प्रमाणे पैसे देतो अशी खोटे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. याचबराेबर या तरुणांकडून काम करवून घेतल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करत, संबंधित तरुणांना शिविगाळ करणे, मारण्याची धमकी देणे, तसेच कुणाकडेही माझी तक्रार करा, माझं काेण काहीही करू शकत नाही, अशी तरुणांना धमकावत हाेता.
या सर्व प्रकारानंतर तसेच अनेकांची फसवणूक झाल्यानंतर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवाध्यक्ष मंजित माने यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर या तक्रारींची दखल घेत, पाेलीस निरीक्षक तानाजी सावंत यांची भेट घेत, झाल्या प्रकाराची सविस्तर माहित त्यांना दिलीय. कोल्हापूर च्या कलाकारांना घेऊन याने रक्तसन ही वेब सीरिस त्याने केली…यातील कलाकारांना,व टेक्निशियन यांना देखील याने गेली 2 महिने त्यांच्या कामाचे साधारण 5 ते 6 लाख रुपये थांबवले आहेत व त्यांना देखील अरेरावी ची भाषा वापरात आहे….म्हणून आज कोल्हापूर युवासेनेच्या वतीने तानाजी सावंत यांच्या कडे लेखी निवेदन सर्व पदाधिकारी यांनी दिले तसेच अश्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी असा ईशारा दिला..
यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शहर युवा अधिकारी वैभव जाधव, युवतीसेना शहर युवती अधिकारी सानिका दामूगडे, शहर समन्व्यक अवदेश करबे, युवती सेना शहर समन्व्यक माधुरी जाधव,उपशहर युवाअधिकारी रोहित वढे, सुनील कानूरकर, अनिकेत ठोंबरे, रघु भावे, कीर्तीकुमार जाधव,प्रिया माने, युवराज मोरे,चैतन्य देशपांडे, प्रतीक भोसले आदी उपस्थित हाेते.
शिवसेना युवासेना युवती सेना यांनी काेल्हापूरात लावले रस्त्यावरच पणत्या. आता पुढे काय!