सन २०२१ पासून अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव जी पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश महासंघाचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून आणि पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय उपाध्यक्ष दिनकर पतंगे,राष्ट्रीय सचिव महादेव खटावकर,कोषाध्यक्ष पांडुरंग दाभोळे, प्रसिद्धीप्रमुख संतोष मुळे,पुणे जिल्हा अध्यक्ष सुनिल होमकर,कोल्हापूर मध्ये भरत कोळेकर या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणेबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवून दिला होता त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आलेली आहे. ही मोठी चांगली आनंदाची बातमी आहे या अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रयत्नाने सातत्य ठेवून काम करीत आहेत त्याला आता यश आलेले आहे धन्यवाद.
संत नामदेव महाराज प्रसन्न
शिंपी समाज संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आज मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीमध्ये संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केल्याची बातमी मुंबईहून प्राप्त झाली आहे यात शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे (इतर मागास बहुजन कल्याण) महामंडळे जाहीर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सागर निवासस्थानी काही दिवसांपूर्वी शिंपी समाज संघटना व पदाधिकारी यांनी बैठक घेऊन निवेदने दिली होती त्यात महामंडळाची मागणी करण्यात आली होती
सर्व समाज बांधवांनी अशी इच्छा धरत अनेक पदाधिकारी यांनी यासाठी अनेक दिवस शासन दरबारी प्रयत्न केले या सर्वांचे आभार तसेच महाराष्ट्र शासनाने सर्व समाज घटकांना न्याय देत सर्वांना एकत्रित घेऊन राज्याच्या विकास करण्याची संकल्पना राबवत आहेत यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व सर्वांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद
नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र सर्व सभासद व सदस्य समाज बांधव. पुणे, महाराष्ट्र.
![]() |
![]() |
![]() |
![]() |