तामिळनाडू येथून आँनलाईन आलेले पन्नास हजार रूपये पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथल्या विजय पाटील याने केले प्रामाणिकपणे परत…
पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गावचा विजय शिवाजी पाटील हा युवक पुणे इथं राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय.घरची परस्थिती बेताची असताना देखील आई वडीलांनी शेतीच्या बळावर मुलाला इंजीनिअर बनवलं. नोकरीच्या शोधात पुण्याला गेलेला विजय मित्रांच्या सोबत स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचा प्रयत्न करतोय. शनिवारी सायंकाळी विजय याच्या गुगलपे नंबरवर तब्बल पन्नास हजाराची रक्कम जमा झाली. एवढी मोठी रक्कम आपल्या मोबाईलवर कुठून आली या विचारात विजय पडला. याबाबतची माहिती त्याने मित्र सुरज कुंभार व पृथ्वीराज लव्हटे या मित्रांना सांगितली. मात्र हि रक्कम तामिळनाडू येथील जयचंद्र तेवर यांच्या मोबाईल नंबरवरून विजय याच्या मोबाईलवर आली होती.तेवर यांना सिंधुदूर्ग सावंतवाडी येथील नातेवाईकांना ही रक्कम पाठवायची होती.परंतू मोबाईल नंबरमधील शेवटच्या अंकातील एका चुकीमुळे नातेवाईकांना पाठवायचे पैसे थेट विजय याच्या खात्यावर जमा झाल्याने हा सर्व प्रकार घडला.
एकीकडे फसव्या योजनांच्या नावावर आँनलाईन गंडा घालून लाखो रूपयांची फसवणूक होत असल्याच्या बातम्या आपण नियमीत वाचत असतो. परंतू पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील विजय शिवाजी पाटील या युवकाने तामिळनाडू येथून त्याच्या खात्यावर आँनलाईन आलेली पंन्नास हजार रूपयाची रक्कम प्रामाणिकपणे परत करून युवकांच्या समोर आदर्श निर्माण केलायं . |
विजय यांचा गुगलपे नंबर इनकमिंगसाठी बंद असल्याने तेवर यांनी संपर्क करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला.परंतू संपर्क झाला नसल्याने जयचंद्र तेवर यांची रात्रभर घालमेल झाली.मात्र रविवारी सकाळी उठून प्रामाणिकपणे विजय यांनी जयचंद्र यांना संपर्क केल्यानंतर जयचंद्र यांनी भावनिक होत पाच हजार बक्षिस म्हणून आपल्याकडे ठेऊन घ्यावे व उर्वरित रक्कम परत पाठवण्याची विजय यांना विनवणी केली.यावेळी विजय यांनी सावंतवाडी येथील त्यांच्या नातेवाईकांचा नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून खात्री करून घेतली व आपल्याला कोणत्याही प्रकारचे बक्षिस नको म्हणत खात्यावर आलेली पंन्नास हजाराची रक्कम जशीच्यातशी परत पाठवून प्रामाणिकपणा अजून जीवंत असल्याचे दाखवून देत सुशिक्षित बेरोजगार असलेल्या विजय ने युवकांसमोर एक आदर्श निर्माण केलाय.