जोल्ले दाम्पत्यामुळे महिलांनी लोटला शर्यतीचा आनंद
एरवी बैलगाडी शर्यत म्हटले की शर्यती शौकिनांची उपस्थिती लक्षणीय असते. शर्यतीच्या ठिकाणी महिलांना स्थान मिळणे फारच कठीण असते. पण बेनाडी तालुका निपाणी येथे जोल्ले ग्रुप व बेनाडी रेसिंग असोसिएशन यांच्या वतीने आयोजित बैलगाडीच्या शर्यतीच्या वेळी या ठिकाणी अनाेखे चित्र पहावयास मिळाले.. चक्क महिलाच शर्यतीच्या ठिकाणी जमल्या.. आणि शर्यती कशा असतात त्या पाहिल्या.. शर्यतीच्या ठिकाणी असा पहिलाच प्रसंग असल्याचे या घटनेनंतर बाेलले जात हाेते.
याठिकाणी कामानिमित्त आलेल्या महिलांना मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यासपीठावर बोलवून घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व महिलांना शर्यती पाहण्यासाठी भाग पाडले. यामुळे कामानिमित्त आलेल्या महिलांना शर्यतीचा आनंद लुटता आला.यावेळी उपस्थित शर्यती शौकिनांच्यातून मंत्री शशिकला जोल्ले असल्यानेच पहिल्यांदा बैलगाडी व इतर शर्यती पाहण्याचा मान महिलांना मिळाला. अशी सकारात्मक चर्चा येथे सुरु हाेती.
या ठिकाणी योगिता पुजारी मानकापूर, शारदा पाटील, श्रीदेवी शिरगावे, सविता पाटील, वैशाली जाधव, राजश्री पाटील, अनिता देसाई सर्व बुध्दीहाळ, ग्राम पंचायत सदस्या साधना माळगे, बेनाडी महिला मोर्चा उपाध्यक्षा राजश्री पाटील या कामानिमित्त आल्या होत्या. या सर्व महिलांना स्वतः मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यासपीठावर बोलवून शर्यती पाहण्यास भाग पाडले.
ग्रामपंचायत सदस्या साधना माळगे म्हणाल्या, आपल्या जन्मापासून आतापर्यंत आपण बैलगाडी शर्यती पाहिल्या नव्हत्या. मंत्री शशिकला जोल्ले यांच्यामुळेच आपल्याला शर्यती पाहण्याचा योग आला आहे. हा अनुभव आपल्या आयुष्यातील एक वेगळाच अनुभव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विकलांग व्यक्तीला खासदार अण्णासाहेब जोले यांनी स्वतः पुढे जाऊन व्यासपीठावर बोलवून घेतल्याने त्यांच्या त्या माणुसकीची चर्चाही मैदानात होत होती. एकंदरीत मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायांमध्ये महिलांना व विकलांगांना दिलेला मान फारच कौतुकास्पद असल्याची चर्चा मैदानात होत होती.
ViDEO पहा: वाढदिवस खासदार पुत्राचा; अपघात शर्यत शौकीनांचा