विनायक जितकर
उदयापासून सरकारी कर्मचारी कामावर रुजू होणार…
राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला आहे. आज या संपाचा सातवा दिवस होता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक आज विधिमंडळात पार पडली. या बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जोपर्यंत सरकार जुन्या पेन्शन योजनेविषयी काही निर्णय घेत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार आहे. अशी भूमिका राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली होती . मात्र राजपत्रित अधिकारी संघटनेबरोबर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली.या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेविषयी सकारात्मक चर्चा झाली . या बैठकीनंतर राज्य सरकारी निमसरकारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी बेमुदर संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे .यामुळे आता उदयापासून कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत.