|
कोल्हापूर : गोकुळने सहकार्य केलेल्या निराधार महिलांच्या कडून रक्षाबंधन निमित्त राखी बांधून घेण्याची परंपरा २००५ साली तत्कालीन चेअरमन विश्वास पाटील यांनी सुरु केला असून त्यांनी व सहकारी संचालकांनी गेली २० वर्ष तो जपलेला आहे. त्यानुसार आज संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक युवराज पाटील यांना रक्षाबंधन निमित्त राजापूर ता.शिरोळ येथील श्रीमती भारती चिंचणे व बेलवले, ता.कराड येथील श्रीमती वैशाली शिंदे यांनी राखी बांधून ऋणानुबंध जपले हा कार्यक्रम गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे पार पडला.
राजापूर, ता. शिरोळ येथील महिला भारती चिंचणे यांचे पती २००५ च्या महापुरात वाहून गेले. एवढेच नाही तर त्यांचे राहते घर व जनावरे देखील या पुरात वाहून गेलीत. त्यांचेवर कोसळलेला दु:खाचा डोंगर सावरण्यासाठी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी भारती चिंचणे यांना घर बांधण्यासाठी त्यावेळी गोकुळमार्फत आर्थिक सहाय्य करून त्यांच्या जीवनात जगण्याची उमेद निर्माण केली.याची जाण ठेवून भारती चिंचणे व वैशाली शिंदे यांनी गेली २० वर्षे गोकुळचे व आपले ऋणानुबंध रक्षाबंधनाच्या निमित्ताने जपलेले आहेत. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील,दीपक पाटील आदी उपस्थित होते. दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा – अरुण डोंगळे GOOD NEWS- भाविकांसाठी खुषखबर… साैंदतीमध्ये मिळणार गाेकुळचे दुध, दुधजन्य पदार्थ गोकुळ लवकरच २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल – नविद मुश्रीफ दुग्ध उत्पादन वाढीसाठी गोकुळच्या सुधारित योजना नक्कीच लाभदायी ठरणार…- नविद मुश्रीफ गोकुळ कर्मचारी पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची संस्था नाही, तर विश्वासाचा आधार- नविद मुश्रीफ गोकुळ कर्मचारी पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची संस्था नाही, तर विश्वासाचा आधार- नविद मुश्रीफ गाेकुळच्या या बातम्याही सात त्याने वाचल्या गेल्या… चर्चेच्या ठरल्या. वाचा तुम्हीही. |
GOOD NEWS ‘गोकुळ’ च्या रक्षाबंधन परंपरेतून २० वर्षांचा ऋणानुबंध जपला…
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.












































































