GOOD NEWS- भाविकांसाठी खुषखबर… साैंदतीमध्ये मिळणार गाेकुळचे दुध, दुधजन्य पदार्थ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सौंदत्ती यात्रेनिमित्त गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या गाडीचे पूजन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, अशोक पुणेकर,संतोष पाटील,श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्ष किरण मोरे, सुरेश बिरबोळे, प्रशांत खाडे, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर,विजय पाटील, उदय पाटील,बाबुराव पाटील, सुनिल मोहिते,प्रदीप साळोखे, अच्युतराव साळोखे, मोहन साळोखे, चव्हाण, सरनाईक सेवा संघटनेचे पदाधिकारी व भाविक आदी दिसत आहेत.

कोल्‍हापूर- कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळचे दुध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणार्या गाडीचे पूजन गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर कोल्हापूर येथे करण्यात आले व त्यानंतर गाडी सौंदत्ती येथे रवाना करण्यात आली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा २२ डिसेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३ इ. रोजी होत असून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून लाखो भाविक जात असतात यामध्ये कोल्हापूर मधून जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. सौंदत्ती येथे,यात्रा काळात पूजाअर्चा, चहा पाणी, नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्यनेमाचे कार्यक्रम होत असतात. यासाठी गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थाची आवश्यकता असते. गतवर्षी प्रमाणे याही वर्षी ही गोकुळमार्फत यात्रेकरूंची सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदत्ती येथे गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, अशोक पुणेकर,संतोष पाटील,श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्ष किरण मोरे, सुरेश बिरबोळे, प्रशांत खाडे, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर,विजय पाटील, उदय पाटील,बाबुराव पाटील, सुनिल मोहिते,प्रदीप साळोखे, अच्युतराव साळोखे, मोहन साळोखे, चव्हाण, सरनाईक सेवा संघटनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

​

 

 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.