विनायक जितकर
गोकुळच्या व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांची साथ यामुळे काटकसर व बचतीचा कारभार सुरू…
कोल्हापूर – मुंबईतील दुग्धशाळ व पॅकिंग सिस्टीममुळे गोकुळ दूध संघाची वार्षिक तब्बल बारा कोटी रुपयांची बचत होणार आहे. या बचतीच्या रकमेतून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना आखू आणि त्यांच्या पदरात आणखी चार जादा पैसे पडतील यापद्धतीने नियोजन करू अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) चेअरमन अरुण डोंगळे यांनी केली.
![]() |
![]() |
गोकुळ दूध संघांशी संलग्न हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे झाला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या पशुवैद्यकीय अधिकारी व विस्तार सुपरवाझर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना चेअरमन डोंगळे यांनी गाेकुळ दूध संघामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. चेअरमन डोंगळे म्हणाले, ‘गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यापासून दूध उत्पादकांना केंद्रीभूत ठेवून कामकाज सुरू आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांचे मार्गदर्शन, संचालक मंडळीचे सहकार्य आणि गोकुळच्या व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांची साथ यामुळे काटकसर व बचतीचा कारभार सुरू आहे. दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बळावर वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गोकुळ दूध संघ निश्चितपणे साध्य करेल.
| जनावरांच्या वंध्यत्वावर मात करण्यासाठी गोकुळचे मिनरल मिक्चरवर १५ टक्के अनुदान आहे. तसेच दुध उत्पादकांना शास्त्रोक्त पद्धतीने दुग्ध व्यवसायाची माहिती होणेसाठी माणकापूर तालुक निपाणी येथील प्रफुल्ल माळी यांची म्राकोट्रेनिंग सेंटरसाठी निवड झाली आहे. याचा दूध उत्पादक व संस्थांनी लाभ घ्यावा.’ असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केली. जेष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले कि हातकणंगले तालुक्याचा भौगीलिक विचार केला असता इतर तालुक्याच्या तुलनेत गोकुळला म्हैस दुधाचा पुरवठा हा कमी आहे, त्यामध्ये म्हैस दूध वाढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व संकलित झालेले सर्व दुध संघास पाठवावे असे आवाहन केले. |
संचालक सुजित मिणचेकर यांनी स्वागत केले. संचालक मुरलीधर जाधव यांनी आभार मानले. संपर्क सभेला संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.














































































