शाहूवाडी – येथील भारतीय दलित महासंघाच्या वतीने तहसीलदार शाहूवाडी यांना महागाईच्या निषेधार्थ केंद्रसारकारचा जाहीर निषेध करणारे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात. घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंची अन्यायी आवाजवी दरवाढ करून शेतकरी, कष्टकरी,मजूर, कामगार व सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकाला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या केंद्रसरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. नैसर्गिक आपती, कोरोना महामारी,नोटबंदी आणि वाढणारी महागाई मूळे सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटक आर्थिक विवनचणेत सापडला असून परिणामी भुकबळी व आत्महत्तेच्या प्रमाणात प्रचंड वाढ होतं आहे. त्यामुळे महागाईविराेधात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.
देशात आवाजवी महागाई वाढल्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होतं आहे. विषमता हे गुमागिरीचे आणि शोषणाचे प्रभावी माध्यम आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि घरगुती गॅस व जीवनावशक वस्तूंच्या दरवाढी विरोधात केंद्रसरकारचा जाहीर निषेध करत ही अन्यायी दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा राज्यभर ठीक ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनावर प्रदेश अध्यक्ष ( भारतीय दलित महासंघ ) अनिरुद्ध कांबळे,आकाश कांबळे, सुरेश पाटील,दयानंद कांबळे, संतोष कट्टे,सिद्धार्थ बनसोडे,विल्सन घोलप, सागर गायकवाड,शशिकांत जाधव यांच्या सह्या आहेत.
श्री धोपेश्वर नयनरम्य परिसर शाहुवाडीच रांगड सौंदर्य