(शब्दांकन जी.जी.पाटील)
आमचा रांगडा शाहूवाडी तालूका म्हणजे निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण झालेला.धार्मिक ,ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचा देदिप्यमान वारसा लाभलेला.२० हजार हेक्टर पेक्षा जास्त परिसराचा लाभलेला जंगलाचा भाग हाच आमच्या पर्यटनाचा महत्वाचा मुद्दा.आमच्या रांगड्या मातीत मी आज तुम्हांला घेऊन जात आहे.निसर्ग सौंदर्यायाची उधळण झालेला आणि धार्मिक वारसा जपणारा आमच्या शाहूवाडी तालूक्याची निसर्ग पांढर असणारा उदगीरी परिसर.आज उदगिरी येथिल धार्मिक वारसा जपणारी आई काळम्मा व सरस्वती महाकाली देवीची यात्रा .
वास्तविक पाहता सोयी सुविधांची वाणवा आसलेला परंतू निसर्ग सौंदर्याने भरभरुण निसर्ग सौंदर्याची उधळण झालेला हा परिसर.मलकापूर पासून पूढे करुंगळे फाट्यापासून आत साधारणतः ३५ कि.मी.अंतरावर उदगिरी दाट जंगलात वसलेल आहे.निनाई परळे धरणाच्या काठावरुण सुरुवातीला पाच कि.मी.चांगला रस्ता असून पुढे दाट झाडीतील कच्चा रस्ता आहे.पूर्वी बॉक्साईट मुळे ह्या रस्त्यावर सतत वाहणांची ये जा आसायची.गोंगाट असायचा परंतू सध्या उत्खनन बंद झाल्याने वाहनांची घरघर थांबली असून जंगली जनावरे मुक्त संचार करत आहेत.
![]() |
भरगच्च,रांगडे धबधबे ,उंच सडे,निरव शांतता,अस्सल गावराण जीवन यांमुळे हा परिसर मनाला गारवा देतो. उदगीरी जाण्यासाठी कोकरुड,आरळा व शित्तूर वारुण मार्गाने सुद्धा उदगीरी जाता येते.होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला येथे आई काळम्मा ,महाकाली व सरस्वती देवीची यात्रा भरते. खूप भक्तगण जमतात.कोरोनामुळे दैन वर्षे यात्रा भरली नव्हती .परंतू सद्या कोरोनाचा मुक्त झाल्यामुळे काळजी घेऊन उत्साहात यात्रेचा कार्यक्रम संपन्न होत आहे.नागरी सुविधांची वाणवा असलेला परंतू निसर्ग सौंदर्याची उधळण झालेला.आमचा धार्मिक वारसा असलेला ,निसर्ग पांढर असलेला हा परिसर पाहण्यासाठी आमच्या रांगड्या मातीतल्या जेथे सुर्याची किरणे सुद्धा दबकत येतात -निसर्ग पांढर उदगीरीला नक्कीच भेट द्या.
विशेष साैजन्य-
डॉ.झुंझार माने
स्वराज्य प्रतिष्ठान
युगंधर फिल्म प्रोडक्शन
९८८१९८१०७३