विनायक जितकर
दसरा चौकात हजारोच्या संख्येने मराठा समाज एकवटणार : वसंतराव मुळीक
अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने चैत्रपाडवा महामेळावा नियोजनासाठी मंगळवार पेठ येथे बैठकीचे आयोजन केले होते २३ मार्च रोजी भगतसिंग,सुखदेव,राजगुरू या क्रांतीकारकांना तसेच मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे कै. अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन करून सभेला सुरुवात होईल
महामेळाव्याच्या नियोजनासाठी गावोगावी संपर्क मोहीम व जिल्ह्यात १००सभांचे तालुकावार नियोजन करणार
मराठा समाजाच्या मागण्या शासन दरबारी सोडवणुकीसाठी दबाव गट निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर पाडवा महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, यामुळे नक्कीच समाज जागृत होईल. महामेळाव्यात मराठा आरक्षणासह आर्थिक विकास महामंडळ, सारथी संस्थेच्या कामकाज, विद्यार्थी युवकांचे प्रश्र,सीमाप्रश्र यावर चर्चा करण्यात येणार असून शासनाकडे अनेक अडचणी या मेळाव्याच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.समाज एकसंघ होणे ही काळाची गरज आहे या मेळाव्याच्या माध्यमातून संघटीत शक्तीतून प्रश्न मार्गी लागून समाजाच्या हितासाठी ठोस भूमिका घेता येईल यासाठी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहेप्रास्ताविक शशिकांत पाटील, स्वागत शैलजा भोसले, अध्यक्षस्थानी संभाजीराव जगदाळे होते, बुजुर्ग व्यक्ती, बधूं-भगिनीसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडहिंग्लज वाढीव हद्दीतील प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याची मागणी….