स्व. दिनकर वडर सोशल फाऊंडेशनचे काम समाजपयोगी – सौ. रोहिणी आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप समारंभ संपन्न

गारगोटी प्रतिनिधी – स्व.दिनकर वडर सोशल फाऊंडेशनचे काम समाजपयोगी असून फाऊंडेशनला सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणी अर्जुन आबिटकर यांनी दिले. शिवाजीनगर (गारगोटी) येथे स्व.दिनकर वडर सोशल फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगेचे वितरण जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणी अर्जुन आबिटकर यांचे हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणी आबिटकर म्हणाल्या, स्व.दिनकर वडर सोशल फाऊंडेशनचे काम समाजपयोगी आहे. गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग असो किंवा आयोजित केलेले आरोग्य शिबीर असो अशा कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्यात या फाऊंडेशनला सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. स्व.दिनकर वडर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीपाद वडर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मोरे, उपसरपंच प्रशांत भोई यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी श्री. मौनी विद्यापीठाचे शासन प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, हणबरवाडीचे सरपंच तानाजी खोत, माजी उपसरपंच अरुण शिंदे, विजय सारंग, माजी उपसरपंच प्रशांत भोई, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भरत शेटके, माजी सरपंच छाया सारंग, सौ.रुपाली राऊत,माजी उपसरपंच सौ.शबाना बागवान, अल्ताफ बागवान, सर्जेराव मोरे, शिवसेना मागासवर्गीय सेलचे तालुकाप्रमुख पांडुरंग कांबळे, शरद मोरे, चंद्रकांत गोरे, रफीक बागवान, दत्तात्रय वडर, सुशांत गुरव आदी उपस्थित होते. स्वागत स्व. दिनकर वडर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीपाद वडर यांनी प्रास्ताविक आलताफ बागवान यांनी तर आभार राहूल वडर यानी मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.