WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

एका वर्षात तब्बल  29 नवीन उपकेंद्रे उभारणीचा संकल्प; दाेन वर्षात 33 हजार कृषिपंपांना वीजजोडणी….

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

‘शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्या विकासकामी’

महावितरणकडून कृषिक्षेत्राच्या पायाभूत विद्युत सुविधांसाठी 236 कोटींची कामे

कोल्हापूरात 9 तर सांगलीत 20 नवीन उपकेंद्रे

कोल्हापूर : महावितरणने कृषी धोरण 2020 अंतर्गत शेतकऱ्यांनी थकबाकी पोटी भरलेल्या रक्कमेतून कृषी आकस्मिक निधी तयार केला आहे. या निधीत कोल्हापूर, सांगलीत जिल्हास्तरावर 236 कोटी रूपये उपलब्ध आहेत. या निधीतील शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्या विकासकामी खर्च करण्यात येतो आहे. त्यातून 29 नवीन 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्रे, 18 उपकेंद्रांची क्षमता वाढ, 327 नवीन वितरण रोहित्रे उभारणी इ. कृषिक्षेत्राच्या पायाभूत विद्युत सुविधा बळकटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. गत दोन वर्षात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 33 हजार कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर परिमंडळाचे  मुख्य अभियंता परेश भागवत यांनी दिली आहे.

  • कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृषिक्षेत्राच्या सिंचनासाठी एका वर्षात तब्बल  29 नवीन उपकेंद्रे उभारणी करणे ही महावितरणची एक भरीव कामगिरी असणार आहे. कृषिक्षेत्राचा वाढता वीजभार लक्षात घेऊन कोल्हापूरात जिल्हास्तरीय 47 कोटी  कृषी आकस्मिक निधीतून 9 नवीन 33/11 के.व्ही. उपकेंद्रे व 12 उपकेंद्रांची क्षमता वृध्दीची कामे प्रस्तावित आहेत. जरगी (ता.गगनबावडा), निवडे (ता.पन्हाळा), चिमगाव (ता.कागल), शिरोळ (ता.शिरोळ) या नवीन उपकेंद्रांची कामे प्रगतीपथावर आहेत.

कोल्हापूर जिल्हा-

तालुका नवीन उपकेंद्र उपकेंद्र क्षमता वाढ
करवीर 1 4
पन्हाळा 1
गगनबावडा 1
कागल 1 2
चंदगड 1
गडहिंग्लज 1 1
शिरोळ 1 1
हातकणंगले 1 2
भुदरगड 1
आजरा 1 1

कारेकुंडी (ता.चंदगड), शिप्पुर (ता.गडहिंग्लज), या नवीन उपकेंद्रांच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. मासेवाडी (ता.आजरा), चावरे (ता.हातकणंगले), दिंडनेर्ली (ता.करवीर) या तीन नवीन उपकेंद्रांचा प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे. शिये (ता.करवीर), वडकशिवाले (ता.करवीर), बालिंगा (ता.करवीर) या उपकेंद्रांची 5 एमव्हीए ते 10 एमव्हीए क्षमता वृध्दीसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. कोरोची (ता.हातकणंगले) येथे 10 एमव्हीए तर कोगे (ता.करवीर), दारवाड (ता.भुदरगड), पट्टणकोडोली (ता.हातकणंगले), केनवडे (ता.कागल), पिंपळगाव (ता.कागल) या उपकेंद्रांच्या 5 एमव्हीए क्षमता वृध्दीची कामे प्रगतीपथावर आहेत. शिरोळ (ता.शिरोळ), हेब्बाळ (ता.गडहिंग्लज), उत्तुर (ता.आजरा) या उपकेंद्रांच्या 5 एमव्हीए क्षमतावाढीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

कृषि आकस्मिक निधीतून प्रगतीपथावरील व प्रस्तावित  पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे कोल्हापूर, सांगलीतील विद्युत जाळे विस्तारणार आहे. अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासह विद्युत सुविधांपासून वंचित, दुर्लक्षित शेतकरी वर्गास सिंचनासाठी वीजेची उपलब्धता झाल्याने कृषी क्षेत्राच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.

सांगलीत जिल्हास्तरीय  116 कोटी 97 लक्ष कृषी आकस्मिक निधीतून 20 नवीन 33/11 के.व्ही. उपकेंद्रे व 6 उपकेंद्रांची क्षमता वृध्दीची कामे प्रस्तावित आहेत. भिकवडी बु. (ता.खानापूर), घरनिकी (ता.आटपाडी), कुंडल 2×10 एमव्हीए क्षमतेचे (ता.पलूस), शेटफळे (ता.आटपाडी), आरवडे-चिंचणी (ता.तासगाव), अंकले (ता.जत), कोकळे (ता. कवठेमहांकाळ) या नवीन उपकेंद्रांची कामे प्रगती पथावर आहेत. टाकवे (ता.शिराळा), बिरनाळ (ता.जत), वाझर (ता.खानापुर), दिघंची (ता.आटपाडी), हिवतड (ता.आटपाडी),  चिखली (ता.शिराळा), हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) या नवीन उपकेंद्रांच्या उभारणीसाठी आणि लिंगवरे (ता. आटपाडी),  शिवणी (ता.कडेगाव), शिरसगाव (ता.कडेगाव) या उपकेंद्रांच्या 5 एमव्हीए क्षमता वृध्दीसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. निंबवडे (ता.आटपाडी), निंबळक (ता.तासगाव), काळमवाडी (ता.वाळवा), खंडाळ (ता.जत), साळमळगेवाडी (ता.जत), साळशिंगे (ता.खानापूर), या नवीन उपकेंद्रांच्या उभारणीसाठी व तिकोंडी (ता.जत), दरीकोन्नुर (ता.जत), शेगाव (ता.जत) या उपकेंद्रांच्या 5 एमव्हीए क्षमता वाढीसाठी प्रस्ताव मंजूरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 200 नवीन 100 केव्हीए क्षमतेच्या नवीन वितरण रोहित्रांची कामे प्रस्तावित आहेत. सांगली जिल्ह्यात 7 कोटी 12 लक्ष निधीतून 127 नवीन वितरण रोहित्र उभारणीची कामे सुरु आहेत. कवठेमहांकाळ विभागातील शेतीच्या सिंचन क्षेत्रातील वाढ लक्षात घेऊन त्या भागातील विद्युत जाळे मजबुती करणासाठी जत उपविभागात 63 तर संख उपविभागात 55 व इस्लामपुर विभागात 9 नवीन वितरण रोहित्रे उभारली जात आहेत. इस्लामपुर विभागात 11 के.व्ही. वाटेगाव फिडरचे विलगीकरणासाठी 27 लक्ष 45 हजार निधीतून उच्चदाब वाहिनी उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

सांगली ग्रामीण विभागात 33 के.व्ही. दुधगाव व कवठेमहांकाळ 33 केव्ही. घाटनांद्रे फीडरचे काम प्रस्तावित आहे. शेतीपंपांना योग्य दाबाचा पुरवठा व्हावा, यासाठी सांगली ग्रामीण 15, इस्लामपूर 9 तर कवठेमहांकाळ विभागात 13 कॅपॅसिटर बँक बसविण्यात येणार आहेत. महावितरणकडून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सन 2022-23 मध्ये अनुक्रमे 6752 व 11525 तर सन 2021-22 मध्ये अनुक्रमे 5904 व 8861 अशा एकूण 33 हजार 42 कृषिपंपांना युध्दपातळीवर वीजजोडण्या देण्याचे काम करण्यात आले आहे.

“लाईनमन” महावितरणचे सैनिक

महापारेषणचा रसिकांना झटका… कलागुणांच्या अजब सादरीकरणातून मिळविला बक्षिसांचा खजिना!

सांगली जिल्हा

 

तालुका नवीन उपकेंद्र उपकेंद्र क्षमता वाढ
जत 4 3
आटपाडी 5 1
खानापूर 3
तासगाव 2
कडेगाव 2
शिराळा 2
कवठेमहांकाळ 2
पलूस 1
वाळवा 1
नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी