विनायक जितकर
कागल नगरपालिकेकडील प्रस्तावित नवीन भुयारी गटार योजनेस निधी व प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनेस राज्यस्तरीय तांत्रिक मंजुरी मिळणे बाबातची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कागल : नगरोत्थान योजनेतून कागल नगरपरिषदेकडील प्रस्तावित नवीन भुयारी गटर योजनेस निधी मंजूर करणेबाबत व केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत कागल साठी नवीन पाणी पुरवठा योजनेस राज्यस्तरीय तांत्रिक समितीस मंजुरीसाठी सादर करणे बाबतची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेसमरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत कागल साठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून ती नजीकच्या काळात राबविली जाणार आहे. सदर योजनेच्या पूर्णत्वानंतर भावी काळामध्ये उद्भवणा-या ड्रेनेज पाण्याच्या समस्येच्या अनुषंगाने राज्यस्तर नगरोत्थान योजनेतून कागल नगरपरिषदेस नवीन भुयारी गटर योजना प्रस्तावित करणे गरजेचे होणार आहे. तरी त्याकरिता राज्यस्तर नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर करणेची कार्यवाही शासनस्तरावरून व्हावी म्हणजे नगरपरिषदेस नजीकच्याच काळात या योजनेचा सविस्तर प्रस्ताव तयार करणे व एकाच वेळी या दोन्हीही योजनेच्या पाईप एकाच भुयारी लाईनमधून टाकणे यासाठी एकाच वेळी रस्त्याची खुदाई करने व ती भरणे बचतीचे दृष्टीने सोईचे होईल. या दृष्टीकोणातून ही रक्कम लवकरात लवकर मंजूर करावी.या प्रस्तावासोबत केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत कागल नगरपरिषदे कडील नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीस मंजुरीसाठी सादर करणे बाबत ही निवेदन दिले आहे.
केंद्रशासनाच्या अमृत २.० या संकेतस्थळावर कागल नगर परिषदेकडील पाणी पुरवठा योजनेस मा. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे प्रादेशिक विभाग, पुणे यांनी योजनेच्या रक्कम रु. ३९ कोटी 3 लाख इतक्या रक्कमेसह तांत्रिक मान्यता दिली आहे. तसेच, नगरपरिषदेचा ठराव व आवश्यक ती अन्य कागदपत्रे यासोबत सादर करणेत येत आहेत. सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणेत यावा असेही निवेदनात म्हंटले आहे.