पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने चैत्र यात्रे करिता विशेष व्यवस्था
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने चैत्र यात्रे करिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस विभागासाठी ठिकठिकाणी ट्टेहाळणी मनोरे, त्याठिकाणी स्वतंत्र ध्वनीक्षेपण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी नारळ फोडण्या करीता विशेष व्यवस्था करण्यात आली असून नारळाचे पाणी पसरू नये यासाठी मंदिर आवारात स्टेनलेस स्टील स्टँड बसविण्यात आले आहे.
भाविकांसाठी डोंगर पायथ्याच्या पार्किंग पासून डोंगरावर ये – जा करण्यासाठी 40 मोफत बसेसची सुविधाही देण्यात आली आहे. सर्व शासकीय कर्मचारी, स्वयंसेवक व इतर कर्मचारी यांना जेवण पुरवठा करण्यासाठी 13000 फॉइल कंटेनरचा पुरवठा करण्यात येणार आहे.यात्रा कालावधीत कोणतेही वाहन बंद पडल्यास, व इतर अत्यावश्यक सेवेसाठी 2 क्रेन सर्व्हिसेसची सुविधाही पुरवण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रशासन व अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 30 बिनतारी संदेशवहन वॉकी टॉकी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. दिशा दर्शक फलकही यात्रा ठिकाणी लावण्यात येणार आहेत. दर्शन मंडप ठिकाणी रांगेतील थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून शिवाजी चौक व सेंट्रल प्लाझा येथे एलईडी स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेराद्वारे गर्दीवर तसेच पार्किंग वर देखील नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
तब्बल 140 कॅमेरे यांची सर्व यात्रे वर नियंत्रण व देखरेख असणार आहे. परदेशातील व परराज्यातील भाविकांना फेसबुक, यूट्यूब वेबसाईट, सोशल मीडिया द्वारे थेट लाईव्ह दर्शन देण्याची सोय करण्यात आली आहे. यात्रेत यात्रेकरूंची विशेषतः महिला भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी 150 तात्पुरते शौचालय वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. पार्किंग ठिकाणी प्रकाश व्यवस्था व मोबाईल लाईट टॉवर व अस्का लाईट सुविधा उभारण्यात येणार असून भाविकांच्या गाड्यांचे पार्किंग करीता जेसीबी द्वारे जागा सपाटीकरण, रोलिंग व इतर सुविधाही करण्यात येत आहेत.