संविधान रक्षणाच्या सन्मानार्थ पोलीस कोठडीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी साठी नागाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

(शिराेली- रुपेश आठवले) –संविधान रक्षणाच्या स्मरणार्थ पोलीस कोठडीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी साठी नागाव बंद उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथीलसर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने परभणी  येथे झालेल्या संविधान रक्षणाच्या स्मरणात पोलिसाच्या मारण्यात सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यामुळे याचा निषेध म्हणून नागाव मधील सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने समता परिसर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून  बंद पाळला. यावेळी गावातील सर्व दुकाने, शाळा, विकास सोसायटी बंद करण्यात आली. त्यानंतर बाईक रॅली काढून नागाव फाटा आंबेडकर संभाजीनगर येथे येथे व्यवसायिकांना बंद  करण्याचे आव्हान करण्यात आले.

आंबेडकर संघटनेमार्फत  केलेल्या या आवाहनाला गावात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी गावातून ती बाईक रॅली ग्रामपंचायत जवळ आली असता, काही गावातील आंबेडकरी अनुयायांचे मनोगत व्यक्त  केले. शहीद सोमनाथ सुर्यवंशी साठी दोन मिनिटं स्तब्ध राहून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष शरद पाटील, अभिनंदन साळुंखे, भिकाजी सावंत, आप्पा शर्मा ,सुरेश नागावकर, युवा नेते विद्याधर कांबळे, विवेक नागावकर, अनिल वायदंडे, ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर, बबलू लंबे, सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे, सागर कांबळे, मोहन कांबळे, राजेंद्र धनवडे, असे अन्य आंबेडकर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .पोलीस स्टेशनचे पीआय सुनील गायकवाड यांनी शांततेच्या मार्गाने त्या गोष्टीचा निषेध करावा, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व कायदा व सुव्यवस्था राखावी या आवाहनालाही उपस्थितांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर समता नगर येथे या बाईक रॅलीचे समर्पण झाले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

काेल्हापूरमध्ये भव्य-दिव्य महायज्ञ… तामिळनाडूचे राष्ट्रीय संत डॉक्टर वसंत विजय महाराज यांची प्रमुख उपस्थिती

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.