काेल्हापूरः काेल्हापूर सहसंपूर्ण महाराष्ट्रासाठी काेल्हापूर येथे महायज्ञ करण्यात येणार आहे. लाेंकाचे आयुष्य सुखी, समाधानी आनंदी रहावे.. जगात शांतता नांदावी यासाठीच देशातील २५ राज्यातील भक्त मिळून हा भव्य दिव्य महायज्ञ काेल्हापूर येथे मनाेभावे साकारत आहेत.
राष्ट्रीय संत डॉक्टर वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त आठ दिवसीय श्री महालक्ष्मी महोत्सवाला रविवार दिनांक 26 रोजी माेठ्या उत्साहात आणि भक्ती पूर्ण वातावरणात तसेच भव्य दिव्य महायज्ञ साकारून प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर येथील शिरोली टोलनाका येथे सुवर्णभूमी लाँन येथे 5 मार्चपर्यंत हा महोत्सव सोहळा सुरू राहील. पहिल्या दिवशी केरळचे राज्यपाल आरिफ खान यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी गोरगरीब जनतेला रेशन धान्य आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले .सुमारे 13 एकर जागेवर हा भव्य दिव्य असा महायज्ञ महोत्सव सुरू झाला आहे. या ठिकाणी भव्य कथा मंडप आणि महायज्ञासाठी 108 हवन कुंड उभारण्यात आले आहे. यावेळी बांबूचा भव्य दिव्य महाल उभा करण्यात आला असून मंडपात 5000 पंच धातू मूर्ती दर्शन व पूजनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मंडपात प्रथमदर्शन सुंदर, आकर्षक अशी 21 फुटी महालक्ष्मी आणि नऊ कोटी अष्टलक्ष्मी व अष्टभैरव यांची प्रतिकृती उभारली आहे. गुरुदेव श्री वसंत विजयजी यांच्या हस्ते सकाळी मनोभावे पूजा करण्यात आली. दुपारी २ ते ४ या वेळेत महालक्ष्मी पुराणातील अमृतमय महाकथेचे पठन हाेणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार ते सात या वेळेत महायज्ञ होईल .आणि रात्री आठ ते दहा पर्यंत प्रसिद्ध गायक लकबीर सिंग लख्खा यांचे भजन सादर होणार आहे. असे विविध कार्यक्रम ५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत.
या संपूर्ण महाेतस्वाची सगळ्याती माेठी जमेची बाजू ही की, या महाेत्सवासाठी खर्चिल्या जाणाऱ्या रकमेपैकी ५० टक्केहून अधिक रक्कम ही काेल्हापूर वासियांच्या शिक्ष, अन्न धान्य वितरण साठी वापरली जाणार आहे. 05 मार्चपर्यंत दरराेज सकाळ ते सायंकाळापर्यंत महाप्रसाद, देवी भागवची दिव्यकथा, भजन संध्या पूजन यज्ञ असे निशुल्क धार्मिक कार्यक्रम हाेणार आहेत. काेल्हापूर व जवळपासच्या सर्व जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने अतिदुर्लभ क्षी काेल्हापूर महालक्ष्मी महाउत्सव २०२३ ला भेट देऊन धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयाेजकांतर्फे करण्यात आले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम श्री अखिल भारतीय पार्श्व पद्मावती सेवा मंडळा तथा श्री पार्श्व पद्मवती सेवा ट्रस्ट कृष्णगिरी (तमिळनाडू) यांच्यावतीने काेल्हापूर शिराेली टाेलनाका येथे सुवर्णभूमी लाँन येथे आयाेजित केला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर- 9051390513 आणि 8051390513
या उपक्रमातील वैशिष्ट अशीः -हजाराे लाेकांसाठी अन्नधान्याची मदत, महालक्ष्मी देवीची पूजा, अभिषेक, व १०८ कुंडात महायज्ञ, २ हजार महिलांना साडींचे वाटप. ०३ सर्वाेत्कृष्ट समाज सेवकांचा सत्कार व पुरस्कार. १० सर्वाेत्कृष्ठ शिक्षकांचा सन्मान. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगाैरव. श्री महालक्ष्मी देवी भागवत दिव्यकथा पुराणचे प्रवचन. आणि संपूर्ण काेल्हापूर वासियांसाठी सलग आठ दिवस महाप्रसाद आणि राेज सायंकाळी पूजा हवन संपल्यानंतर भजनांची, तसेच भक्ती गीतांची मैफल रंगणार आहे. यात राेज नामांकित गायक यांचा समावेश रहाणार आहे.
स्वामीजींचा अल्पपरिचय असा
पूर्ण जगातील वेगवेगळ्या देशामध्ये भारत भूमी ही धर्मभूमी, देवभूमी आहे. इथे वेळोवेळी वेगवेगळ्या अनेक संतानी जन्म घेऊन ज्ञान व भक्तीची ज्योत प्रज्वलित करून त्याद्वारे पसरणाऱ्या धर्मप्रकाशाने येथील भूमी दैदिप्यमान केली आहे. अशाच एका दिव्य साधकांचा जन्म तमिळनाडू या राज्यातील कृष्णगिरी या गावामध्ये झाला. त्यांनी त्यांच्या तरुण वयातच संसार अनित्य मानून दीक्षा घेतली आणि प्रण केला की मला स्वतःला ज्या ज्या प्रकारची कष्ट सहन करावी लागली, त्या प्रकारच्या कष्टामधून समाजाला मुक्त करण्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करीत राहीन. हेच ते संत आहेत ज्यांनी विश्व प्रसिद्ध कृष्णगिरी शक्तीपीठ धामाची स्थापना केली ते म्हणजे कृष्णगिरी शक्तीपीठाचे पिठाधीश्वर, विद्यासागर, राष्ट्रीय संत वसंत विजयजी महाराज त्यांच्याकडून मातृतुल्य प्रेम मिळाल्यामुळे त्यांचे भक्त प्रेमाने त्यांना “आम्मा” म्हणून देखील संबोधतात.
मोठी साधना केलेल्या पूज्य गुरुदेवांनी काशी, विंध्याचल, हिमालय येथील दुर्गम भागामध्ये आपल्या आयुष्यातील बारा वर्ष व्यतीत केली आणि उत्कृष्ट योग व मंत्र साधना द्वारे आत्मसाक्षात्कार: प्राप्त केला. दुर्गा सप्तशतीच्या सहाव्या अध्यायामध्ये वर्णन केलेला व जैन धर्मीयद्वारा आटाधित पद्मावती मातेने स्वप्नामध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांनी 23 एकटाच्या परिसरा मध्ये एक अलौकिक तीर्थ तथा गोशाळेची स्थापना केली असून आज ते क्षेत्र तामिळनाडू टुरिझम डेव्हलपमेंट ने मुख्य पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.परमपूज्य गुरुदेवांच्या चटणी शरण आलेल्या करोडो लोकांनी आत्मज्ञान व मनशांती प्राप्त केली आहे. त्यांच्या साध्या सोप्या संभाषणाने, निरूपणाने सर्वच लोक मंत्रमुग्ध होतात. गरीब व दुःखी जनतेची सेवा, पूजा व भक्ती करणे हेच पूज्य गुरुदेवांचे लक्ष आहे. पुज्य गुरुदेव वसंत विजय जी महाराज हे आपल्या महाराष्ट सरकारने घाेषित केलेले महाराष्ट्र राज्याचे राज्य अतिथी आहेत.
पूज्य गुरुदेव अशा साधकांपैकी एक आहेत की जे वर्षातील 1365 दिवस नित्यनियमाने सहा ते आठ तास दररोज स्वतः बसून पूजा करतात. पूज्य गुरुदेव जिथे जिथे गेले तिथे त्यांनी शिक्षण व आरोग्य या क्षेत्रामध्ये सेवा कार्य करण्याचा भरपूर प्रयत्न केला. वेगवेगळ्या क्षेत्रामधील आपल्या भक्तांच्या मदतीने 30 कोटी पासून 300 कोटी रुपयांपर्यंत मेडिक्लेम इन्शुरन्स केले आहेत. त्याचप्रमाणे कपडे, धान्यवाटप यासारखे ही कामे मोठ्या प्रमाणावर सेवाभावाने केली आहेत.