WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने जीवनशैलीत बदल करण्याची गरज-आचार्य देवव्रत

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा-गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

* कॅन्सरचा विस्फोट टाळण्यासाठी सेंद्रिय शेती आवश्यक * पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचवणार

कोल्हापूर : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्नाटकच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी पाणी तज्ज्ञ राजेंद्रसिंह, आयआयटी बीएचयूचे प्रदीप मिश्रा, राजस्थानचे कृष्ण जाखड, लोकभारतीचे गोपाल उपाध्याय, डॉ. हर्षा हेगडे, पूर्णानंद स्वामी, प्रिया शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच कणेरी मठ संस्थानचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार विक्रम सावंत, आमदार शेखर निकम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सेंद्रिय शेतीपद्धती तसेच पंचमहाभूत तत्वांच्या दालनांना व प्लॅस्टिक पुनर्निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, प्राचीन काळी पंचतत्त्वांच्या संरक्षणाचे संस्कार प्रत्येकाला दिले जात होते. परंतु, सध्या आपल्या भौतिक सुखासाठी मानव पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. हे काम कोणत्याही जीवजंतूकडून होत नसून ते केवळ मानवाकडून होत आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांच्या अति वापराने कॅन्सर सारख्या भयानक रोगांना सामोरे जावे लागत असून येत्या दोन दशकात देशात कॅन्सरचा भयंकर विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावर सेंद्रिय शेती हाच उपाय असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम केवळ शासकीय यंत्रणेने नव्हे तर प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे. पंचमहाभूतांचे  संरक्षण ही लोकचळवळ होणे गरजेचे असून हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या ठिकाणी राबवण्यात येत असलेले पर्यावरण रक्षणाचे विविध उपक्रम प्रेरणादायी आहेत. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या लोकसहभागातून मानवतेच्या कल्याणाच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी प्रत्येक महिलेने खारीचा वाटा उचलावा

कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, संस्कार, परंपरा, अध्यात्म यावर भर असणारा भारत देश आहे. फॅशनचे युग, वैज्ञानिक युग, कलियुग म्हणून आपण आपली संस्कृती, परंपरा विसरत चाललो आहोत. दुध, दह्याला बाजूला सारुन चॉकलेट, पिझ्झाकडे वळत आहोत. याचे दुष्परिणाम आपल्याला दुर्धर आजार आणि नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून भोगावे लागत आहेत. यावर केवळ पर्यावरण रक्षण हाच उपाय आहे. हे काम महिला शक्ती करु शकते. महिलांना गौरव, सन्मानाची वागणूक दिली तर समाजात निश्चित चांगला बदल घडतो. पर्यावरण रक्षणाचे संस्कार प्रत्येक महिलेने आपल्या बाळाला देवून पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलावा. येत्या काळात पाण्याचा जपून वापर केला नाही तर पाण्यासाठी महायुद्ध होऊ शकते, यासाठी पाण्याचा जपून वापर करा. मातीचे संरक्षण करा.. पर्यावरणाचे रक्षण करा, असे सांगून आरोग्य, क्रीडा, सेंद्रिय शेती, शिक्षण आदी क्षेत्रात काडसिध्देश्वर स्वामीजींनी महत्त्वपूर्ण कार्य केले असून यादृष्टीने कणेरी मठात सुरु असलेला हा पर्यावरण रक्षणाचा लोकोस्तव महत्वपूर्ण आहे, असे मत मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले.

पाणी तज्ज्ञ  राजेंद्रसिंह म्हणाले,  पूर्वीच्या काळी जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश या पंचमहाभूतांचे पूजन आणि रक्षण केले जात असे. परंतु सध्या पंचतत्त्वांना हानी पोहोचवली जात असून त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. नीर, नारी आणि नदीला महत्व मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.प्रदीप मिश्रा, गोपाल उपाध्याय यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश मार्गदर्शनातून दिला. आभार उदय सावंत यांनी मानले.दरम्यान श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेले विविध उपक्रम, सेंद्रीय शेती, पंचमहाभूत तत्वांची माहिती देणारी दालने, शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स आदींबाबत माहिती दिली.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी