तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
जुन्या पेंशन संदर्भात 14 मार्चपासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपात शिक्षक भारती संघटना सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य सचिव अशोक जाधव यांनी दिली. जाधव म्हणाले, गेल्या दोन तीन महिन्यांपासून राज्य आणि देशभर जुन्या पेन्शनची चर्चा चालू आहे. या संपात शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राज्य अध्यक्ष विलास पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भारती संघटना संपात सहभागी होत आहे. संपामुळे विद्यमान सरकारही घाबरले आहे.
कर्मचारी आता जागा झाला आहे. आपण चुकीचे बोलावे म्हणून सरकारचे प्रतिनिधी उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. कर्मचारी वर्ग निराश झाला तर येत्या निवडणुकीला त्याचे परिणाम दिसून येतील. मुद्दा थोडा शांत झाला की, कर्मचारी वर्गात चर्चा होईल की जुनी पेंशन मिळने आता कठीण आहे. आणि हेच त्यांना पाहिजे आहे.
c, पण यावेळी असं होणार नाही. 1977 नंतर पहिल्यांदाच बेमुदत संप होत आहे. सर्व विभाग सहभागी होत आहेत. सर्व कर्मचारी बांधवांनी आपापल्या जिल्हा कार्यालयात 14 रोजी लिखित निवेदन देण्यासाठी एकत्र यावे. जुनी पेन्शन ही जबाबदारी सर्वांची आहे. केवळ पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन काहीच होणार नाही. सर्व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सर्वांनी संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.