आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर यांची निवड

इचलकरंजी TEAM WATCH  – प्रकाश आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेची पहिलीच सभा नुकतीच हाेऊन त्यामध्ये संस्थेच्या चेअरमनपदी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची तर व्हा.चेअरमनपदी राजेंद्र आरेकर आणि सेक्रेटरीपदी श्रीकांत टेके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचबराेबर संस्थांतर्गत गृहप्रकल्पासाठी पात्र लाभार्थ्यांकडून घरकुलासाठीचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. सर्वसामान्य व कामगार वर्गाला स्वतःच्या हक्काचे, दर्जेदार आणि परवडणारे घर मिळावे या उद्देशाने शहरात जय सांगली नाका टाकवडे राेडवर एका महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.

तळमजल्यावर  पार्किंग आणि वर सात मजले अशा एकूण 13 इमारतींचा हा भव्य सहकारी गृह प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी प्रकाश आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करण्यात आली असून रितसर नाेंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पासाठी माेठा प्रतिसाद मिळाला असून बँकिंग तपासणीनंतर पात्र ठरलेल्या सभासदांसाठी ही याेजना वेगाने पुढे नेली जात आहे.

या नुतन संस्थेच्या संचालकपदी प्रकाश कल्लाप्पा आवाडे, राजेंद्र शंकर आरेकर, श्रीकांत टेके, संजय आनंदराव सातपुते, कपिल शशिकांत शेटके, केशव महादेव पेटकर, शिवाशिष महेंद्र पाटील साै. सुदर्शना मारुती पाटील, साै. उज्वला सदाशिव कित्तुरे, साै. दिपाली कपील लाेटे आणि रामा निलाप्पा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या नुतन संचालक मंडळाची पहिली सभा जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील मकसुद शिंदी आणि उदय उलपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

त्यानंतर सर्वांनुमते संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र आरेकर तसेच सेक्रेटरीपदी श्रीकांत टेके यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रकाश दत्तवाडे, महेश सातपुते, चंद्रकांत इंगवले, नरसिंह पारीक, एम. के. कांबळे, तन्वी कुलकर्णी, मंगल सुर्वे, विद्या लवटे, फरीद मुजावर आदींसह घरकुल लाभार्थी उपस्थित हाेते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.