मुश्रीफानंंतर महाडिक घराण्यालाही दणका; शौमिका महाडिक ७ मतांनी पराभूत! बंटी पाटलांची ‘शिट्टी’ वाजली, महायुती भुईसपाट

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375
  • बंटी पाटलांची ‘शिट्टी’ वाजली, महायुती भुईसपाट: राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या पॅनेलने एकहाती वर्चस्व राखले आहे. महायुतीच्या अनेक मंत्र्यांची फौज आणि रणनीती सतेज पाटलांच्या झंझावातापुढे अपयशी ठरली.

  • शौमिका महाडिक यांचा निसटता पराभव: गोकुळच्या विद्यमान संचालिका आणि भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष शौमिका अमल महाडिक यांना यंदाच्या चुरशीच्या लढतीत केवळ ७ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. सतेज पाटील यांच्या ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या’ महिला उमेदवाराने येथे बाजी मारली.
  • फेरमतमोजणीची (Recounting) मागणी: केवळ ७ मतांचा फरक असल्याने शौमिका महाडिक यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यामुळे या गटातील अंतिम अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • महाडिक कुटुंबाला मोठा धक्का: शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सून आणि भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या भावजय आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेल्या शौमिका यांचा पराभव हा महाडिक गट आणि भाजपसाठी खूप मोठा राजकीय धक्का आहे.

सतेज पाटील यांच्या भूमिकेला मोठे बळ: “गोकुळ हा फक्त आणि फक्त कोल्हापूरचाच आहे आणि गोकुळचे निर्णय कोल्हापुरातूनच होतील,” या आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या स्वाभिमानी भूमिकेला कोल्हापूरच्या दूध उत्पादकांनी आणि ठरावधारकांनी मतपेटीतून प्रचंड पाठबळ दिले.

  • समविचारी आघाडीची जोरदार मुसंडी: निवडणुकीच्या मतमोजणीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला.
  • शशिकांत खोत यांचा शानदार विजय: समविचारी आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत खोत यांनी ओबीसी गटातून उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला.
  • अंधश्रद्धा आणि भीतीच्या राजकारणाला चपराक: मतदारांना विविध देवी-देवतांच्या शपथा घालणे, परडी भंडाऱ्यावर हात ठेवायला लावणे आणि कोपाची भीती दाखवणे अशा प्रकारच्या दबावाच्या राजकारणाला दूध उत्पादकांनी नाकारले.
  • मतदारांचा विवेक जागा: बाळूमामा, हालसिद्धनाथ आणि यल्लमा देवीच्या नावाने मतदारांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न मतदारांनी आपल्या विवेकाच्या जोरावर अपयशी ठरवले.
  • महायुतीच्या दाव्यांना धक्का: निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येणारे ‘२५-०’ चे आणि ९० टक्के ठराव बाजूने असण्याचे दावे निकालानंतर फोल ठरले.
  • स्वाभिमानाचा विजय: हा निकाल म्हणजे कोल्हापूरच्या दूध उत्पादकांचा स्वाभिमान, पारदर्शकता आणि योग्य नेतृत्वावर असलेला विश्वास अधोरेखित करणारा ठरला आहे.
  • सतेज पाटील यांच्या ‘समविचारी आघाडी’चे विजयी उमेदवार (१६ जागा)
    सर्वसाधारण आणि राखीव गटात सतेज पाटील यांच्या पॅनेलने पूर्णपणे वर्चस्व 
    1. शशिकांत पाटील चुयेकर (सर्वसाधारण गट)
    2. बाबासाहेब श्रीपती चौगुले (सर्वसाधारण गट)
    3. अभिजित प्रभाकर ताईशेटे (सर्वसाधारण गट)
    4. किसन बापू सो चौगुले (सर्वसाधारण गट)
    5. राहुल बजरंग देसाई (सर्वसाधारण गट)

    6. बाबासाहेब विष्णू देवकर (सर्वसाधारण गट)
    7. विश्वजित दिनकरराव जाधव (सर्वसाधारण गट)
    8. विद्याधर बाबूराव गुरबे (सर्वसाधारण गट)
    9. सचिन दौलतराव घोरपडे (सर्वसाधारण गट)
    10. अंजना केदारी रेडेकर (महिला राखीव गट)
    11. भाग्यश्री धीरज डोंगळे (महिला राखीव गट)
    12. शशिकांत शामराव खोत (इतर मागासवर्गीय – OBC गट) (यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचा पराभव केला)
    13. राजुबाबा जयवंतराव आवळे (अनुसूचित जाती/जमाती गट)
    14. बयाजी देवू शेळके (भटक्या विमुक्त जाती/जमाती गट)
    महायुतीप्रणीत ‘शेतकरी विकास आघाडी’चे विजयी उमेदवार (०९ जागा)
    महायुतीचे अनेक दिग्गज आणि माजी अध्यक्ष पिछाडीवर राहिले, तर केवळ ९ उमेदवारांना विजय मिळवता आला: 

        राजेश नरसिंगराव पाटील

    1. राहुल पी. एन. पाटील
    2. रणजित के. पी. पाटील
    3. रणजित दिलीप पाटील
    4. अंबरिशसिंह संजय घाटगे
    5. चेतन अरुण नरके
    6. अजित शशिकांत नरके
    7. अजित पांडुरंग पाटील
    8. वीरेंद्र संजय मंडलिक

    दिग्गजांना धक्का: गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि विद्यमान चेअरमन नवीद मुश्रीफ या महायुतीच्या प्रमुख चेहऱ्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे

 

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
  • अंधश्रद्धेला नकार: प्रचारादरम्यान मतदारांना वेगवेगळ्या देवी-देवतांच्या दिलेल्या शपथा आणि भीतीच्या राजकारणाला मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. 

हा संपूर्ण विजय कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील सतेज पाटील यांच्या मजबूत रणनीतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे

 


  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.