विनायक जितकर
डी. वाय. पाटील पॉलिटेक्नीकमध्ये ‘टेकनोवा’ स्पर्धा उद्घाटन प्रसंगी बोलताना क्रिडाई माजी राज्याध्यक्ष राजीव परीख. सोबत कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके, समन्वयक प्रा. धैर्यशील नाईक
कसबा बावडा – जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला पाया भक्कम पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग करावा, असे आवाहन क्रीडाई चे माजी राज्याध्यक्ष अभियंते राजीव पारीख यांनी केले. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने आयोजित ‘टेकनोवा’ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ही स्पर्धा सहा इव्हेंट मध्ये झाली . यामध्ये ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. विजेत्यांना एकूण पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात आली.
राजीव पारीख म्हणाले, प्रगत टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. अधिकाधिक प्रक्टिकल ज्ञान मिळवा. देशाच्या विकासामध्ये अभियांत्रिकीचा खूप मोठा वाटा आहे. या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर या ज्ञानाचा वापर देशाच्या विकासासाठी कसा होईल यासाठी प्रयत्न करा. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए.के. गुप्ता म्हणाले, अभ्यास करत असतानाच विद्यार्थ्यानी रोज बदणाऱ्या तंत्रज्ञानानुसार स्वत:ला अपडेट करावें, स्वत:चे तांत्रिक ज्ञान वाढवावे.
प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, आपली भाषा- क्षेत्र कोणतेही असो, आपल्याकडील ज्ञान चांगल्याप्रकारे मांडता आले पाहिजे. विद्यार्थांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थांच्या उज्वल भविष्यासाठी डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक नेहमीच प्रयत्नशील राहील. यावेळी टेक रिक्रुटमेंट, प्रेझेन्ट टेक, स्क्रीन बॅटल, सी टेक, क्ले कार मॉडेलिंग, ग्राफिनोवा, प्रोजेक्ट या प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
‘टेकनोवा’चे समन्वय प्रा. धैर्यशील नाईक यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.