विनायक जितकर
काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र स्वीकारताना युवा उद्योजक सत्यजित जाधव
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या हस्ते त्यांनी निवडीचे पत्र स्वीकारले. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या औद्योगिक कार्याचा, समाजकार्याचा, विकासकामांचा, धार्मिक कार्याचा व क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा वारसा सत्यजित जाधव समर्थपणे पुढे नेत आहेत. याचबरोबर सत्यजित जाधव हे कैलासगडची स्वारी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष व रावणेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा) संचालक व रोटरी क्लबचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर जाधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक व महालक्ष्मी लॉजिस्टिकचे सीईओ या पदाची जबाबदारी सत्यजित जाधव समर्थपणे सांभाळत आहेत. कोल्हापुरातील औद्योगिक समस्यां सत्यजित जाधव सातत्याने शासन दरबारी मांडत आहेत. या कार्याची दखल घेत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या औद्योगिक सेल कडे त्यांची शिफारस केली.
यानुसार औद्योगिक सेलचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनारे यांनी राष्ट्रीय काँग्रेस औद्योगिक सेलच्या सचिव पदी सत्यजित जाधव यांची निवड केली आहे. जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील जागा पूर्ण भरल्याने नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी आणखी दोन औद्योगिक वसाहतींची निर्मिती करावी. राज्यातील औद्योगिक क्षेत्रासाठीचा वीज दर हा इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत वाजवी राहतील व किमान 3 वर्षे स्थिर ठेवावेत.
औद्योगिक जिल्ह्यात कौशल्य विकास महाविद्यालय, कौशल्य विकास केंद्राची स्थापना करावी. कोल्हापूरात लॉजीस्टीक पार्क उभारण्यासठी एमआयडीसीने पुढाकार घेतला होता. लॉजीस्टीक पार्क उभारण्याचे काम लवकर सुरु करावे. औद्योगिक कचर्याची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात यावी. या प्रश्नांसाठी प्राधान्याने पुढाकार घेणार असल्याचे सत्यजित जाधव यांनी सांगितले.